लाचप्रकरणी सहायक मोटार वाहन निरीक्षकास तीन वर्षे शिक्षा, खासगी एजंटालाही कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 11:51 AM2019-03-29T11:51:44+5:302019-03-29T11:53:06+5:30

ट्रॅक्स वाहनावर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी आर. टी. ओ. सुपे पोस्ट (चंदगड)चे तत्कालीन सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत बाळासाहेब शिंदे (रा. कोल्हापूर) व त्यांचा खासगी एजंट समीर रवळनाथ शिनोळकर (रा. यशवंतनगर, ता. चंदगड) यांना प्रत्येकी तीन वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली.

Three years of education and private agent for imprisonment for torture, Assistant Motor Vehicle Inspector also imprisoned | लाचप्रकरणी सहायक मोटार वाहन निरीक्षकास तीन वर्षे शिक्षा, खासगी एजंटालाही कारावास

लाचप्रकरणी सहायक मोटार वाहन निरीक्षकास तीन वर्षे शिक्षा, खासगी एजंटालाही कारावास

Next
ठळक मुद्देलाचप्रकरणी सहायक मोटार वाहन निरीक्षकास तीन वर्षे शिक्षा, खासगी एजंटालाही कारावास ट्रॅक्सवर कारवाई न करण्याबाबत मागितली १० हजारांची लाच

कोल्हापूर : ट्रॅक्स वाहनावर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी आर. टी. ओ. सुपे पोस्ट (चंदगड)चे तत्कालीन सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत बाळासाहेब शिंदे (रा. कोल्हापूर) व त्यांचा खासगी एजंट समीर रवळनाथ शिनोळकर (रा. यशवंतनगर, ता. चंदगड) यांना प्रत्येकी तीन वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली.

ही शिक्षा गडहिंग्लज येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश तथा अप्पर जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध प्रतिनिधी यांनी सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील सुनील तेली यांनी काम पाहिले; यासाठी आकाश उदय घोरपडे (रा. शिनोळी, ता. चंदगड) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आकाश घोरपडे यांचा ट्रॅक्स वाहनाचा व्यवसाय आहे. या वाहनावर कारवाई न करण्यासाठी तत्कालीन सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत बाळासाहेब शिंदे (रा. कोल्हापूर) यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली होती; त्यासाठी आरोपी समीर शिनोळकर या खासगी एजंटाला वापरले होते; त्यामुळे तक्रारदार आकाश घोरपडे यांनी दि. २२ एप्रिल २०१५ रोजी प्रशांत शिंदे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

या खटल्यामध्ये फिर्यादी घोरपडे यांनी न्यायालयासमोर सबळ पुरावे मांडले; त्यामुळे विशेष न्यायालयाने प्रशांत शिंदे व खासगी एजंट समीर शिनोळकर यांना दोषी ठरवून प्रत्येकी तीन वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास तीन महिने जादा साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे गडहिंग्लज अतिरिक्तसरकारी अभियोक्ता सुनील तोली यांनी काम पाहिले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक उदय आफळे यांनी केला.
 

 

Web Title: Three years of education and private agent for imprisonment for torture, Assistant Motor Vehicle Inspector also imprisoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.