कोल्हापूर :दिनदर्शिकेच्या माध्यमातून करवीर निवासीनी आई अंबाबाई देवीचे दर्शन, अंबाबाई-जोर्तिलिंग दिनदर्शिकेचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 04:32 PM2017-12-26T16:32:16+5:302017-12-26T16:52:57+5:30
करवीर निवासीनी आई अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. ज्या भाविकांना देवीच्या दारापर्यंत येता येत नाही अशांना चित्र रुपी दिनदर्शिकेच्या माध्यमातून देवीचा महीमा कळेल. त्यामुळेच ही दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मंगळवारी केले.
कोल्हापूर : करवीर निवासीनी आई अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. ज्या भाविकांना देवीच्या दारापर्यंत येता येत नाही अशांना चित्र रुपी दिनदर्शिकेच्या माध्यमातून देवीचा महीमा कळेल. त्यामुळेच ही दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मंगळवारी केले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अंबाबाई मंदीरातील गारेच्या गणपतीसमोरील पटांगणात मंगळवारी आयोजित केलेल्या अंबाबाई व जोर्तिलिंग यांच्या सचित्र दिनदर्शिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
जाधव म्हणाले, दिनदर्शिकेच्या माध्यमातून आई अंबाबाई प्रत्येकाच्या घरात असावी. या उद्देशाने प्रथमच ही दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. दिवसागणीक देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक रोज येत आहेत. त्यांच्याकरीता सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न देवस्थान समिती करीत आहे.
येत्या काही दिवसांत मंदीर उघडल्यापासून बंद होईपर्यंत भक्तांच्या सोईकरीता प्रथमोपचारासाठी दोन डॉक्टरांचीही नेमणुक केली जाईल. यासह देवस्थानचे अन्नछत्र व भक्त निवास उभे करण्याचा मानस आहे.
मंदीराचा इतिहास व धार्मिकता जपण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. त्यातून मंदीराच्या परिसरातील विविध छोटी मंदीरे ही भक्तांना पाहण्यास खुली केली जातील.
देवस्थानच्या अखत्यारित असलेल्या ३०४२ मंदीरे व हजारो एकर जमीन असून त्याचेही व्यवस्थान करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने समिती सदस्य विविध मंदीरांना भेटी देऊन तेथील अडचणी समजावून घेत आहेत, अशीही माहिती महेश जाधव यांनी यावेळी दिली.
प्रास्ताविक सहसचिव शिवाजी साळवी यांनी केले. यावेळी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य बी.एन.पाटील मुंगळीकर, प्रमोद पाटील, संगीता खाडे, व्यवस्थापक धनाजी जाधव, आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन नंदकुमार मराठे यांनी केले.
दर शुक्रवारी दुपारी २ ते ४ या दरम्यान महीला भक्तांकरीता मोफत कुंकूमार्चन कार्यक्रम आयोजित केला जात आहे. त्यात विधीनंतर श्रीयंत्रही मोफत दिले जाते. याकरीता भक्तांनी नाव नोंदणी सोमवारपुर्वी करणे बंधनकारक आहे. तरी याचा लाभ घेण्याचे आवाहनही जाधव यांनी केले आहे.