‘बाहुबली’ गुरुकुलात स्रेहभोजनाने माजी विद्यार्थ्यांचा ‘थर्टी फर्स्ट’ - गुड न्यूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:02 AM2018-01-05T00:02:25+5:302018-01-05T00:02:49+5:30
बाहुबली : येथील बाहुबली ब्रह्मचार्र्याश्रम गुरुकुलमध्ये १९९४ साली दहावीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी (दि. ३१ डिसेंबर) तेथील विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे
भरत शास्त्री ।
बाहुबली : येथील बाहुबली ब्रह्मचार्र्याश्रम गुरुकुलमध्ये १९९४ साली दहावीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी (दि. ३१ डिसेंबर) तेथील विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे आयोजन करून वर्षाखेर व नववर्षाचे स्वागत करून आपले स्नेहसंमेलन पार पाडले. हे सर्व विद्यार्थी आपल्या कुटुंबीयांसोबत आले होते.
१९९४ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी कोणतीही पाश्चिमात्य संस्कृती किंवा धांगडधिंगा यांना फाटा देत सेलिब्रेशन न करता आपण विधायक पद्धतीने थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे ठरविले. आपण ज्या गुरुकुलमध्ये संस्कार घेतले तेथील विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला.
या बॅचमधील विविध विद्यार्थी पुढे राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, व्यवसाय यामध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. ब्रह्मचारी श्रीधर अण्णा यांनी १९९४ बॅचमधील विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रत्येक व्यक्ती व कुटुंबीयांची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून गुरुकुलने दिलेले धार्मिक संस्कार पुढेही न विसरण्याचे आवाहन केले. सत्य, अहिंसा, त्याग, अपरिग्रह आणि नैतिकता आपल्या आचरणामध्ये जोपासण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाचे नियोजन युवराज पाटील, योगेश पायशेट्टी, प्रवीण पाचोरे, उमेश मसरगुप्पी, विजयकुमार चौगुले, प्रशांत कोईक, जिनगोंडा पाटील, बाबासाहेब पाटील, जयकुमार चौगुले, सुदर्शन चौगुले, प्रवीण किणे, शीतल पाटील, शीतल बुरसे, आदींनी केले होते.
गुरुकुलमधील विद्यार्थी म्हणजे अस्सल सोनं
बाहुबली गुरुकुलच्या मुशीतून धार्मिक संस्कार घेऊ न घडलेले विद्यार्थी जीवनात कधीही तत्त्वांपासून परावृत्त होत नाहीत, ते अस्सल सोनंच आहे. शतकोत्तर वाटचाल करणाºया या गुरुकुलातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊ न गेले आहेत. ते विविध क्षेत्रात सचोटीने आणि न्यायाने कार्यरत आहेत. त्यांचे यश पाहून माझे हृदय प्रफुल्लित होते. आपल्या मातृसंस्थेचे ऋण फेडण्यासाठी आपण नेहमीच असे उपक्रम केले पाहिजेत. - बह्मचारी श्रीधर अण्णा