कुरुंदवाडच्या टिक्काखान पठाण यांचा शहर स्वच्छतेसाठी पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:27 AM2021-08-19T04:27:40+5:302021-08-19T04:27:40+5:30
पठाण हे जिल्हा बँकेच्या औरवाड (ता. शिरोळ) शाखेत कॅशिअर म्हणून सेवेत आहेत. प्रामाणिक सेवेमुळे त्यांनी सेवेच्या ठिकाणीही आपले वेगळेपण ...
पठाण हे जिल्हा बँकेच्या औरवाड (ता. शिरोळ) शाखेत कॅशिअर म्हणून सेवेत आहेत. प्रामाणिक सेवेमुळे त्यांनी सेवेच्या ठिकाणीही आपले वेगळेपण निर्माण केले आहे. राजकारणापासून चार हात लांब असलेले पठाण प्रामाणिकपणे नोकरी करत फावल्या वेळेत सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून घेतले आहेत. महापूर, कोरोना काळातील गरजवंतांना मदतीचा हात दिल्याने त्यांची मदत सर्वसामान्य कुटुंबांसाठी आधारवड ठरली आहे.
जुलैमध्ये आलेल्या महापुराने शहरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. मात्र आपला वेळ चांगल्या कामासाठी खर्ची जावा, यासाठी पालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर आपल्या भागात स्वच्छता करून पालिका प्रशासनाला कष्टाची मदत करत आहेत. शिवाय महापुरातील पंचनाम्यासाठी लागणारी कागदपत्रे मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यांचे हे राजकारणविरहित सामाजिक कार्य चांगलेच चर्चेत आले आहे.
फोटो - १८०८२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - कुरुंदवाड शहरातील पालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना टिक्काखान पठाण यांनी परिसरातील कचरा भरून स्वच्छतेच्या कामात मदत करत आहेत.