Kolhapur: तिलारी घाट अवजड वाहतुकीसाठी बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By विश्वास पाटील | Published: June 20, 2024 05:53 PM2024-06-20T17:53:11+5:302024-06-20T17:54:09+5:30

कोल्हापूर : परिते-गारगोटी-गडहिंग्लज-नागणवाडी-चंदगड-हेरे मोटनवाडी फाटा- कळसगादे कोदाळी-भेडशी ते राज्य हद्द रस्ता तिलारी घाट जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी अवजड वाहतुकीसाठी ...

Tilari Ghat closed for heavy traffic, Kolhapur District Collector orders | Kolhapur: तिलारी घाट अवजड वाहतुकीसाठी बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Kolhapur: तिलारी घाट अवजड वाहतुकीसाठी बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोल्हापूर : परिते-गारगोटी-गडहिंग्लज-नागणवाडी-चंदगड-हेरे मोटनवाडी फाटा- कळसगादे कोदाळी-भेडशी ते राज्य हद्द रस्ता तिलारी घाट जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी अवजड वाहतुकीसाठी ३१ ऑक्टोबर अखेर बंद करण्याचे आदेश गुरुवारी दिले. वाहतूक सुरक्षा उपाययोजनेनुसार हा निर्णय घेण्यात आला.

चंदगड तालुक्यात तसेच तिलारी घाटात पावसाळ्यात अतिवृष्टी होत असल्याने बऱ्याच ठिकाणी रोडच्या बाजूचे संरक्षक कठडे जीर्ण व नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. घाटातून एसटी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे बसचा एखादा अपघात होऊन अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

चंदगड पोलिस ठाणे हद्दीतून बेळगाव, शिनोळी, पाटणे फाटा, हलकर्णी, नागनवाडी, चंदगड, हेरे, मोटणवाडी, तिलारी नगर या मार्गावरून येणारी वाहतूक तिलारी घाटातून होते. घाटातील तीव्र चढ-उतारामुळे रस्त्यांच्या वळणावर वाहनांचा टर्न बसत नाही. तीव्र वळणावर वाहन अडकून राहते व वाहन काढण्यासाठी क्रेन घेऊन जाणे सुध्दा अवघड होते. बेळगाव, कर्नाटक येथून गुगल मॅपवर गोव्याला जाणारा जवळचा रस्ता तिलारी घाटातून दाखवतो. त्यामुळे वाहनचालक या घाटातून प्रवास करतात.

परंतु, घाटाचा अंदाज चालकाला येत नाही. गुगल मॅपवरून परराज्यातून येणाऱ्या अवजड वाहनांवरील चालक हे या घाटाचा अंदाज नसतानाही अवजड वाहने घेऊन जाण्याचे धाडस करतात. त्यामुळे अपघाताच्या घटना व वाहने घाटात अडकून राहण्याच्या घटना घडतात. त्यामुळे मोटारसायकल व इतर चारचाकी वाहनांच्या वाहतुकीस अडथळा होतो.

पर्यायी मार्ग

  • तिलारी घाटातून होत असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग आंबोली घाट तसेच कर्नाटक राज्यातील चोर्ला घाट असे दोन पर्यायी मार्ग आहेत. संकेश्वर-गडहिंग्लज-आजरा-आंबोली ते बांदा हा महामार्ग क्रमांक ५४८ एच या महामार्गाचे काम सुरू आहे.
  • उत्तुर-आजरा-आंबोली मार्गे सावंतवाडी ते गोवा अशी वाहतूक देखील या मार्गावरून होऊ शकते. तरी पर्यायी महामार्गावरून अवजड वाहतुक वळविण्यास हरकत नाही.

Web Title: Tilari Ghat closed for heavy traffic, Kolhapur District Collector orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.