Lok Sabha Election 2019 :  भाजपवर मुलं दत्तक घेण्याची वेळ : जयंत पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 06:26 PM2019-03-24T18:26:06+5:302019-03-24T18:31:20+5:30

ज्यावेळी स्वत:ला मूल होत नाही, त्यावेळी दत्तक घेतले जाते. पाच वर्षे सत्तेत राहूनही पाळणा हलत नाही म्हटल्यावर दुसऱ्याची मुले दत्तक घेण्याची वेळ भाजपवर आली असून, आयाराम-गयारामांच्या कौतुकातच सत्तेची पाच वर्षे गेल्याची टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.

: Time to adopt children at BJP: Jayant Patil's criticism | Lok Sabha Election 2019 :  भाजपवर मुलं दत्तक घेण्याची वेळ : जयंत पाटील यांची टीका

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, मानसिंगराव गायकवाड, राजेंद्र पाटील-यड्रावकर, नानासाहेब गाठ, संगीता खाडे, संध्यादेवी कुपेकर, आदी उपस्थित होते. (छाया- दीपक जाधव)

Next
ठळक मुद्देभाजपवर मुलं दत्तक घेण्याची वेळ : जयंत पाटील यांची टीका सत्तेची पाच वर्षे आयाराम-गयारामांच्या कौतुकातच

कोल्हापूर : ज्यावेळी स्वत:ला मूल होत नाही, त्यावेळी दत्तक घेतले जाते. पाच वर्षे सत्तेत राहूनही पाळणा हलत नाही म्हटल्यावर दुसऱ्याची मुले दत्तक घेण्याची वेळ भाजपवर आली असून, आयाराम-गयारामांच्या कौतुकातच सत्तेची पाच वर्षे गेल्याची टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.

कॉँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठीसाठी रविवारी जयंत पाटील कोल्हापुरात आले होते. आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, दोन्ही कॉँग्रेसने उमेदवारी नाकारलेल्यांना भाजपने मैदानात उतरले आहे, त्यांचे काय होणार हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे कोल्हापुरातही आघाडीचे धनंजय महाडिकच विजयी होतील. शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा मानणारी कोल्हापूरची जनता आहे. ती शिवसेना-भाजपला कधीही भीक घालणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


अडीच लाख खुर्च्या कोल्हापुरात तरी आहेत का?

शिवसेना-भाजपच्या प्रचारार्थ तपोवन मैदानात होणाऱ्या सभेबद्दल विचारले असता, पाटील म्हणाले, ‘खोटे बोल; पण रेटून बोल,’ अशी सवय चंद्रकांत पाटील यांना आहे. जिथे सभा होते, त्या मैदानाची क्षमता किती आहे. अडीच लाख खुर्च्या तिथे बसतील का? ते सोडा, एवढ्या खुर्च्या कोल्हापुरात तरी भाड्याने मिळतात का? अशी खिल्ली त्यांनी उडविली.

नाहीतर ‘सतेज’ यांच्याशिवाय प्रचार

सतेज पाटील यांना कॉँग्रेस नेत्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी दुरुस्त व्हावे. काही वेळा माणसांनी असेच वागायचा निर्धार केलेला असतो. त्यामुळे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू. त्यांनी एकले तर ठीक अन्यथा त्यांच्याशिवाय पुढे जाऊ, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

 

 

Web Title: : Time to adopt children at BJP: Jayant Patil's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.