हेल्पलाईनसाठी महिलांना दोनवेळा फोन करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 12:24 PM2019-12-05T12:24:28+5:302019-12-05T12:28:00+5:30

महिलांवरील अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी १०९१ या हेल्पलाईनला दोनवेळा फोन केल्यानंतरच तक्रारींची दखल घेतली जाते, असे चित्र आहे. या हेल्पलाईनला फोन घ्यायला पुरूष कर्मचारी असल्याने माहिती देण्यास महिला पुढे येत नसल्याचेही वास्तव आहे. दिवसभरात म्हणजे १२ तासांत सरासरी किमान २५ फोन या हेल्पलाईनवरयेत आहेत.

Time to call women twice for helpline | हेल्पलाईनसाठी महिलांना दोनवेळा फोन करण्याची वेळ

हेल्पलाईनसाठी महिलांना दोनवेळा फोन करण्याची वेळ

Next
ठळक मुद्देहेल्पलाईनसाठी महिलांना दोनवेळा फोन करण्याची वेळपोलीस प्रशासनाचा कारभार : दिवसभरात २५ महिलांचे येतात फोन

कोल्हापूर : महिलांवरील अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी १०९१ या हेल्पलाईनला दोनवेळा फोन केल्यानंतरच तक्रारींची दखल घेतली जाते, असे चित्र आहे. या हेल्पलाईनला फोन घ्यायला पुरूष कर्मचारी असल्याने माहिती देण्यास महिला पुढे येत नसल्याचेही वास्तव आहे. दिवसभरात म्हणजे १२ तासांत सरासरी किमान २५ फोन या हेल्पलाईनवरयेत आहेत.

हैद्राबाद येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी प्रवासी वाहनांच्या आत ठळकपणे १५ डिसेंबरपूर्वी प्रदर्शित करावी. ही कार्यवाही पूर्ण केली का नाही, याची तपासणी पोलीस आणि परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी करावी, असे आदेश दिले. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने या हेल्पलाईनचा सध्या कितपत महिलांना उपयोग होतो, याची चौकशी केल्यावर दुसरीच माहिती पुढे आली.

या हेल्पलाईनचे नियंत्रण पोलीस नियंत्रण कक्षातून करण्यात येते. हा फोन घेण्यासाठी महिला कॉन्स्टेबलची नियुक्ती करण्यात आली होती; परंतु गेल्या सहा महिन्यांपासून हे काम नियंत्रण कक्षातील पुरूष कॉन्स्टेबलकडे देण्यात आले आहे. त्यांच्याकडे महिलांचे फोन येतात; परंतु अनेकदा महिला काही बोलत नाहीत किंवा ताई नाहीत का अशी विचारणा करतात, अशी माहिती १०९१ वर संपर्क साधल्यावर मिळाली.

या कॉन्स्टेबलला महिलांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता येत नाहीत; त्यामुळे ते हेल्पलाईनवर फोन करणाऱ्या महिलांना २६५३१३१ हा जिल्हा महिला दक्षता समितीचा फोन नंबर देतात. संबंधित महिलेस पुन्हा तिथे फोन करावा लागतो व आपल्यावरील अन्यायाची दाद मागता येते. हा फोन सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असतो. महिलांवर अत्याचाराची एखादी घटना घडली, की प्रशासन तातडीने काही निर्णय घेते; परंतु त्यात कितपत संवेदनशीलता जपून मदतीला धावून जाण्याचा प्रयत्न असतो, हेच यावरून दिसून येते.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असे..

महिलांवरील अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या १५ नोव्हेंबर २०१४ च्या बैठकीतील सादरीकरणातील सूचनान्वये १०९१ हा हेल्पलाईन क्रमांक लिहिण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या. त्यानुसार हा हेल्पलाईन क्रमांक आॅटोरिक्षा, टॅक्सी, स्कूलबस, एसटी बस, खासगी प्रवासी बसेस, मोटार कॅब आणि खासगी प्रवासी वाहतूक वाहनांमध्ये प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी लिहिणे बंधनकारक राहील. याबाबत पोलीस व परिवहन विभागातील अधिकारी तपासणी करून खात्री करतील.
 

 

Web Title: Time to call women twice for helpline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.