कोरोनाच्या काळात तरी दुधाची बिले संस्थेकडे वर्ग करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:22 AM2021-05-15T04:22:12+5:302021-05-15T04:22:12+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात एक लीटर पासून २०० लीटरपर्यंत दूध उत्पादन करणारा दूध उत्पादक आहे या दूध उत्पादकांची बिले दरदहा दिवसाला ...

At the time of the corona, however, submit the milk bills to the organization | कोरोनाच्या काळात तरी दुधाची बिले संस्थेकडे वर्ग करा

कोरोनाच्या काळात तरी दुधाची बिले संस्थेकडे वर्ग करा

Next

कोल्हापूर जिल्ह्यात एक लीटर पासून २०० लीटरपर्यंत दूध उत्पादन करणारा दूध उत्पादक आहे या दूध उत्पादकांची बिले दरदहा दिवसाला संस्थेत वाटप होत होती. पण गोकूळने सहकार विभागाचा आदेशाचे पत्रक पुढे करून दूध संस्थांना सर्व दूध उत्पादकांची बिले बँकेत वर्ग करण्यासाठी त्यांचे खाते नंबर अनिवार्य केले आहेत. तशी कार्यवाहीही सुरू केली आहे.

सध्या कोणाची महामारी सुरू असल्याने जिल्हा बँकेच्या सर्व शाखाचे शटर खाली करूनच व्यवहार सुरू आहेत उन्हातान्हात खातेदार ग्राहकांना आपले पैसे व व्यवहार करण्यासाठी रंगीत उभारावे लागत आहे, अशावेळी अनेक ग्राहकांना उन्हाच्या तडाख्याने चक्कर येणे असे प्रकार होत आहेत. त्यातच आता दुधाची बिलेही केळशी बँकेकडे वर्ग केल्याने एकच गर्दी अनेक शाखांच्या दारा दिसत आहे ज्या दूध उत्पादकांची दूध दिले शंभर रुपयेपासून पाचशे रुपये हजार अशा पटीत आहेत अशा शेतकऱ्यांना शेतातील कामे टाकून रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे दिवसच्या दिवस वाया जात असून खरिपाची कामे करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.

गोकूळ दूध संघाच्या नूतन संचालकांनी दूध उत्पादकांच्या या अडचणीची दखल घेऊन किमान कोरोना काळात तरी दूध बिले संस्थेतून मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. जर याबाबत निर्णय नाही झाला तर आंदोलन करण्याची भाषा ही दूध उत्पादक यांच्यातून व्यक्त होत आहे.

Web Title: At the time of the corona, however, submit the milk bills to the organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.