कोरोनाच्या काळात तरी दुधाची बिले संस्थेकडे वर्ग करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:19 AM2021-05-29T04:19:52+5:302021-05-29T04:19:52+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात दररोज एक लिटरपासून २०० लिटरपर्यंत दूध उत्पादन करणारा दूध उत्पादक आहे. या दूध उत्पादकांची बिले दर दहा ...
कोल्हापूर जिल्ह्यात दररोज एक लिटरपासून २०० लिटरपर्यंत दूध उत्पादन करणारा दूध उत्पादक आहे. या दूध उत्पादकांची बिले दर दहा दिवसाला संस्थेत वाटप होत होती; पण गोकूळने सहकार विभागाच्या आदेशाचे पत्रक पुढे करून दूध संस्थांना सर्व दूध उत्पादकांची बिले बँकेत वर्ग करण्यासाठी त्यांचे खाते नंबर अनिवार्य केले आहेत, तशी कार्यवाही ही सुरू केली आहे.
सध्या कोरोनाची महामारी सुरू असल्याने जिल्हा बँकेच्या सर्व शाखांचे शटर खाली करूनच व्यवहार सुरू आहेत. उन्हातान्हात खातेदार ग्राहकांना आपले पैसे व व्यवहार करण्यासाठी रंगीत उभारावे लागत आहे. अशावेळी अनेक ग्राहकांना उन्हाच्या तडाख्याने चक्कर येणे, असे प्रकार होत आहेत त्यातच आता दुधाची बिलेही केळशी बँकेकडे वर्ग केल्याने एकच गर्दी अनेक शाखांच्या दारात दिसत आहे. ज्या दूध उत्पादकांची दूध बिले शंभर रुपयांपासून पाचशे-हजार अशा पटीत आहेत. अशा शेतकऱ्यांना शेतातील कामे टाकून रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे दिवसच्या दिवस वाया जात असून खरिपाची कामे करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे
गोकूळ दूध संघाच्या नूतन संचालकांनी दूध उत्पादकांच्या या अडचणीची दखल घेऊन किमान कोरोना काळात तरी दूध बिले संस्थेतून मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. जर याबाबत निर्णय नाही झाला तर आंदोलन करण्याची भाषा ही दूध उत्पादक यांच्यातून व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया
संस्थेतून उत्पादकांना दिली दिली तर पशुखाद्य व इतर उचल यातून होणारी कपात तत्काळ दूध उत्पादन यांना समजते, पण तसे केल्यास कर्मचाऱ्यांना व दूध उत्पादकांच्या अनेक गैरसमज निर्माण होतात. यामुळे या निर्णयाला आम्ही विरोध केला आहे, आम्ही कोणतीही बिले संस्थेतच देत आहोत याबाबत सर्व संस्थांनी एकजूट करण्याची गरज आहे.
उत्तम डाफळे (दत्तात्रय पांडुरंग पाटील दूध संस्था कोगे सचिव)