शेंडा पार्क येथील कुष्ठपिडितावर आली स्वतः जेवण करण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 03:10 PM2019-11-13T15:10:59+5:302019-11-13T15:23:05+5:30
कोल्हापूर ः शेंडा पार्क येथील कुष्ठधाम रुग्णालयातील स्वयंपाकी पगार न मिळाल्यामुळे कामावर येत नसल्याने कुष्ठ पीडित रुग्णांनाच स्वतःचे जेवण स्वतः ...
कोल्हापूर ः शेंडा पार्क येथील कुष्ठधाम रुग्णालयातील स्वयंपाकी पगार न मिळाल्यामुळे कामावर येत नसल्याने कुष्ठ पीडित रुग्णांनाच स्वतःचे जेवण स्वतः करण्याची वेळ आली आहे.
ज्या हातांना संवेदना नाहीत त्यात हाताने चुलीवर त्यांना स्वयंपाक करावा लागत आहे. ज्या शासकीय यंत्रणेकडे जबाबदारी देण्यात आली आहे, ती याकडे दुर्लक्ष करत असल्याने कुष्ठरुग्णांचे दहा दिवसापासून प्रचंड हाल होत आहे.
राज्य शासनाच्या शेंडा पार्क या ठिकाणी निवासी असलेले 15 कुष्ठरोग पीडित रुग्णांसाठी स्वयंपाकी म्हणून दोन कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र गेले वर्षभर त्यांना मानधन न मिळाल्यामुळे त्यांनी गेले दहा दिवसापासून हे काम करण्यास बंद केले आहे. त्यामुळे या कुष्ठ पीडितांवर उपासमाराची वेळ आली आहे.
शासकीय यंत्रणा त्यांच्याकडे लक्ष दुर्लक्ष करत असल्यामुळे हे पीडित येथील स्वयंपाक घराच्या बाहेरच चुली मांडून भात, आमटी करून पोटाची खळगी भरून दिवस काढत आहेत. शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, व या रुग्णांची जेवणाची सोय करावी अशी मागणी जोर धरत आहे.