सरुडमधील शेतीच्या पंचनाम्यांसाठी अखेर मुहूर्त मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:27 AM2021-08-14T04:27:31+5:302021-08-14T04:27:31+5:30
महापूर ओसरताच शासनाने महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु सरूडमधील शेतीच्या पंचनाम्याला विलंब ...
महापूर ओसरताच शासनाने महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु सरूडमधील शेतीच्या पंचनाम्याला विलंब होत असल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. तसेच पंचनाम्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याची मागणी होत होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने सरूडमधील शेतीच्या पंचनाम्यांना मुहूर्त मिळेना' या मथळ्याखाली मंगळवारी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन तालुकास्तरीय शासकीय यंत्रणेने येथील शेतीच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलत येथील शेतीच्या पंचनाम्यासाठी शुकवारी पथक पाठविले आहे. कृषी सहायक किरण पाटील, गावकामगार तलाठी उषा राबाडे, ग्रामविकास अधिकारी बी. डी. कडवेकर, पोलीसपाटील दीपाली घोलप, कोतवाल अरुण भालेकर यांच्या पथकाने शुक्रवारपासून शेती पंचनाम्यांना सुरुवात केली आहे. सरुड गावच्या हद्दीतील वारणा व कडवी नदीकाठाशेजारील महापुराने नुकसान झालेल्या शेतीच्या पंचनाम्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली असून, सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पंचनाम्यांची ही प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कृषी सहायक किरण पाटील यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.