वेळ गेली, महाडिकांचा प्रचार नाहीच;सतेज पाटील यांनी ए. वाय. पाटील यांना सुनावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:56 AM2019-04-01T00:56:29+5:302019-04-01T00:56:33+5:30
कोल्हापूर : ‘जिल्ह्णातील कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस संपविण्याचा विडा उचलणाऱ्या महाडिक कुटुंबीयांना सहकार्य कसे करायचे? असा सवाल करीत आता वेळ ...
कोल्हापूर : ‘जिल्ह्णातील कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस संपविण्याचा विडा उचलणाऱ्या महाडिक कुटुंबीयांना सहकार्य कसे करायचे? असा सवाल करीत आता वेळ निघून गेली आहे. मी तुमच्यासोबत नाहीच,’ अशा शब्दांत कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मनधरणीसाठी आलेले राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासमोर भूमिका स्पष्ट केली. त्यांनी गेल्या पाच वर्षांतील महाडिक यांच्या भूमिकेचा पाढाच वाचला.
आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा आज, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उद्या, मंगळवारी होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी ए. वाय. पाटील हे पाटील यांना निमंत्रण देण्यासाठी रविवारी गेले होते. जिल्हाध्यक्ष पाटील व कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी सकाळी साडेदहा वाजता लक्षतीर्थ वसाहत येथे आमदार पाटील यांची भेट घेतली. राहुल गांधी व शरद पवार यांनी हातात हात घालून देशात परिवर्तनासाठी कंबर कसली असताना आपण गल्लीतील भांडण दिल्लीत नेऊ नका. महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याबरोबरच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मेळाव्यास उपस्थित राहावे, अशी विनंती ए. वाय. पाटील यांनी केली. त्यावर सतेज पाटील म्हणाले, आपण येथेपर्यंत आल्याबद्दल आभार मानतो; पण माझ्या आठ प्रश्नांची उत्तरे द्या. मग मी काय करावे ते सांगा. मागील लोकसभा निवडणुकीपासून महाडिक यांनी दोन्ही कॉँग्रेसना कोणत्या निवडणुकीत मदत केली? उलट जिल्ह्णातून कॉँग्रेस, राष्टÑवादी संपविण्याचा विडा उचलणाऱ्यांना मदत कशी करायची?आम्हाला जमेत धरूच नका, अशा शब्दांत सतेज पाटील यांनी ‘ए. वाय.’ यांचा प्रस्ताव धुडकावला.
पक्षनिष्ठेपुढे अपमानाचा विसर
महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत ए. वाय. पाटील यांच्या स्नुषा मेघा पाटील यांचा अनपेक्षितपणे पराभव झाला. यामागे कोण कोण होते, हे जिल्ह्णाला माहीत आहे, तरीही पक्षनिष्ठेपुढे झालेला अपमान विसरून लोकसभेच्या प्रचारात सक्रिय कसे झाला? यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
पवारसाहेबांच्या बैठकीला बोलावूच नका
शरद पवार यांच्या बैठकीसाठी बोलावूच नका आणि मी
येणारही नाही. ते ज्येष्ठ नेते
आहेत, त्यांच्यासमोर
काहीतरी वेगळे बोलणे
योग्य होणार नाही. त्यांची भेट
पुणे किंवा मुंबईत घेतो, असेही आमदार पाटील यांनी सांगितल्याचे समजते.
फुकटच्या आॅक्सिजनचे आता महत्त्व कळेल
वातावरणातील आॅक्सिजन मोफत असतो; त्यामुळे त्याचे महत्त्व माणसाला कळत नसते. त्याचे खरे महत्त्व ‘आयसीयू’तील रुग्णाला कळते. आता
फुकटच्या आॅक्सिजनचे
महत्त्व कळेल, असा सूचक इशाराही सतेज पाटील यांनी यावेळी दिला.
गेल्या लोकसभेला सर्व किल्मिष मनातून काढून महाडिक यांच्या प्रचारात सक्रिय झालो; पण मदतच केली नाही, असा आरोप कसा?
६ महिन्यांत विधानसभेला माझ्याच विरोधात भावाला उभे केले. येथे आघाडी धर्म कोठे गेला होता?
महापालिका निवडणुकीत कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या विरोधात उघड प्रचार का केला?
विधान परिषदेला दोन्ही कॉँग्रेसची उमेदवारी मला मिळाली असताना, माझ्याविरोधात काम का केले?
जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत कोणाबरोबर होता?
जिल्हा परिषदेत दोन्ही कॉँग्रेसची सत्ता उलथवून लावून काय मिळविले? पी. एन. पाटील यांचा मुलगा अध्यक्ष होत असताना भाजप सदस्यांच्या गाडीचे सारथ्य का केले?
महापालिका स्थायी सभापती निवडीत राष्टÑवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या स्नुषांचा पराभव करण्यात कोणाचा हात होता? आशिष ढवळे कोणाचा कार्यकर्ता?
हसन मुश्रीफ व आपल्यावर सुनील कदम व सत्यजित कदमांनी खालच्या पातळीवरचे आरोप केले; त्यावेळी तुम्ही कोठे होता?
सदर बझार येथे मुश्रीफ यांच्या गाडीवर दगडफेक करणारे कार्यकर्ते कोणाचे? त्यांना का आवरले नाही?
६ महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा भावाचे धर्मसंकट येणार नाही का?