गावासाठी वेळ, नव्या कल्पना देणाऱ्यांनीच निवडणूक लढवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:21 AM2021-01-02T04:21:55+5:302021-01-02T04:21:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क / राधानगरी : गावच्या गरजा पाहून कोणती विकासकामे करायची हे गावाने ठरवायचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क / राधानगरी :
गावच्या गरजा पाहून कोणती विकासकामे करायची हे गावाने ठरवायचे आहे. त्याशिवाय गावे समृद्ध होणार नाहीत. वेळ देऊ शकणाऱ्यांनी व नवीन कल्पना राबविण्याची धमक असणाऱ्यांनीच ग्रामपंचायत निवडणुकीच्या फंदात पडावे, असे प्रतिपादन संसद आदर्श ग्राम समिती सदस्य व पाटोदा(जि. औरंगाबाद)चे आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी केले. सोन्याची शिरोली वयोवृद्ध मातृ-पितृ ऋणमुक्त सदिच्छा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राधानगरीच्या सरपंच कविता दीपक शेट्टी होत्या.
मान्यवरांच्या हस्ते वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या ८० व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
हास्य अभिनेता अभिजित कुलकर्णी म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांनी त्या काळात संस्कृती रूजवली ती जपण्याची गरज आहे. महिला सरपंच परिषदेच्या अध्यक्षा राणी पाटील यांचे भाषण झाले. अशोक मोरे यांनी स्वागत केले. राजाराम निऊंगरे यानी प्रास्तविक केले, संजय पारकर यांनी आभार मानले. यावेळी मिलिंद कारदगे, शशिकला सांगावकर, संपदा कारदगे, फेजिवडेचे सरपंच फारूक नाळवेकर, सागर माने, हरीआबा चौगले,अभिजित सांगावकर, दीपक शेट्टी, एम. आर. गुरव, ए. जी. चौगले, अनिल बडदारे, संतोष पाटील, विठ्ठल चौगले, नरसिंह चौगले, दत्तात्रय चौगले आदी उपस्थित होते.
फोटो ओळ- सोन्याची शिरोली ज्येष्ठ नागरिक सत्कार कार्यक्रमात भास्करराव पेरे-पाटील यांनी संबोधित केले. यावेळी हरी आबा चौगले, कविता शेट्टी आदी उपस्थित होते.
०१ सोन्याची शिरोली कार्यक्रम