हवा भरताना टायर फुटून तरुणाचा मृत्यू

By admin | Published: January 3, 2015 12:52 AM2015-01-03T00:52:46+5:302015-01-03T00:53:19+5:30

सुमारे २५ फूट उंच उडून तो खाली आदळला. तर सुमारे १५० फुटांवर मेंदू व व्हीलचा एक भाग उडून पडलेला होता

Tire breaks in the air and the death of the youth | हवा भरताना टायर फुटून तरुणाचा मृत्यू

हवा भरताना टायर फुटून तरुणाचा मृत्यू

Next

तुरंबे : कोल्हापूर-गारगोटी राज्य मार्गावर चंद्रे (ता. राधानगरी) येथे पंक्चर काढत असताना हवा भरत असताना टायर फुटून पांडुरंग शंकर कुंभार (वय ३५) हा तरुण जागीच ठार झाला. सुमारे २५ फूट उंच उडून तो खाली आदळला. तर सुमारे १५० फुटांवर मेंदू व व्हीलचा एक भाग उडून पडलेला होता. कुंभार कुटुंबामधील कर्त्या पुरुषावरच अचानक काळाने झडप घातल्याने हे कुटुंब उघड्यावर पडले आहे. घटनेची राधानगरी पोलिसांत नोंद आहे. चंद्रे फाट्यावर पांडुरंग कुंभार यांचा पंक्चर काढण्याचा व्यवसाय आहे. आज, शुक्रवार सायंकाळी ते ट्रॅक्टरच्या पुढील चाकाचे पंक्चर काढत होते. हवा भरताना इनरमध्ये हवेचा दाब वाढल्याने लोखंडी व्हील तुटले. टायरवर बसलेले कुंभार सुमारे २५ फूट उंचावर टायरसह उडाले व लोखंडी कमानीला डोके आदळले. यामध्ये ते जागीच ठार झाले. कवटी फुटल्याने सुमारे १५० फूट मेंदू आणि व्हीलचा एक भाग उडून पडला होता. घटनास्थळावरील दृश्य पाहून अनेकांना धक्काच बसला. मनमिळावू स्वभावाचा पांडुरंग याने २०१२ पासून हा व्यवसाय सुरू केला होता.
घटनास्थळी पंक्चर काढण्याचे सर्व साहित्य विखुरले होते. गेल्या काही दिवसांपासून येथे विद्युतपुरवठा कमी अधिक दाबाने मिळत असे. या दरम्यान हवा भरण्याचे मशीन अचूक हवेचा दाब दाखवत नव्हते. यामुळेच ही घटना घडली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच लोकांनी मोठी गर्दी केली होती. पांडुरंग यांच्या पश्चात पत्नी, तीन व पाच वर्षांची दोन मुले आहेत. वडिलांचा सायकल पंक्चर काढण्याचा व्यवसाय गावात आहे.

Web Title: Tire breaks in the air and the death of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.