ऊस उत्पादकांचे ३०० कोटी कारखान्यांकडे थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:07 AM2018-02-12T00:07:27+5:302018-02-12T00:07:27+5:30
कोपार्डे : सध्या साखर दर घसरल्याचे कारण पुढे करून हंगामाच्या सुरुवातीला ठरलेला उसाचा एफआरपी + १०० अशा पहिल्या हप्त्याऐवजी २५०० रुपये असा प्रतिटन दर देण्याची सुरुवात केली आहे. यामुळे हंगाम २००६/०७ मधील दुसºया हप्त्यापोटी कारखानदारांनी बुडविलेल्या ३०० कोटी रुपयांची सध्या चर्चा सुरू आहे.
गेल्या दोन वर्षांपासून साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होताना थोडी खळबळ होते; पण शासन म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील हे मध्यस्थाची बजावत असलेली चोख भूमिका व शेतकरी संघटना, कारखानदार त्याला देत असलेला सामोपचाराचा मान यामुळे सुरळीत हंगाम सुरू होतो; पण अचानक साखरेचे दर गडगडतात आणि ऊस उत्पादकांचे उसाचे पैसे वेळेत देण्यासाठी कारखानदारांना यातायात करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते. यावर्षीही हीच अवस्था झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीला साखरेचे दर ३६०० रुपये प्रतिक्विंटल होते. ते आज २८०० ते २९५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरलेले आहेत. यामुळे बँंकांनी पतपुरवठा करण्यासाठी हात आखडता घेतल्याने कारखानदारांना एफआरपी+१०० असा पहिला हप्ता देण्यासाठी पैशांची उपलब्धता होत नसल्याने यावर्षी त्याऐवजी २५०० रुपये देण्यासाठी सुरुवात केली आहे.
नेमकी अशीच आर्थिक परिस्थिती हंगाम २००६/०७ मध्ये हंगामाच्या सुरुवातीला झाली होती. यावेळी हंगामाची सुरुवात असल्याने कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्यास विलंब होत असल्याने ऊस उत्पादकांचेच यात नुकसान होणार असल्याने शेतकरी संघटनांनी मिळतेजुळते घेण्यासाठी ९००+३८० असा फॉर्म्युला ठरविण्यात आला होता. यात ९०० पहिला, तर ३८० रुपये हंगाम संपल्यानंतर देण्याचे ठरले. यावेळी मध्यस्थी म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी भूमिका बजावली. तर दिवंगत खा. सदाशिवराव मंडलिक, खा. राजू शेट्टी व माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी महत्त्वाची भूमिका घेतली होती. मात्र, हंगाम संपला तरी हा ३८० रुपयांचा दुसरा हप्ता दहा वर्षे झाली तरी अजून शेतकºयांना मिळालेला नाही. या हंगामात सर्वसाधारण ९० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांकडून करण्यात आले होते.
या उसाचे ३८०प्रमाणे दुसºया हप्त्याची रक्कम ३४० कोटींच्या घरात आहे. आजही हे हंगाम २००६/७ मधील ३४० कोटी रुपये कारखानदारांच्या बटव्यात आहेत.
सर्वाधिक रक्कम वारणा व जवाहरकडे थकीत
२००६/0७ च्या हंगामात वारणा कारखान्याने १२ लाख ५५ हजार ६७९ मे. टन उसाचे गाळप केले. यापोटी ४७ कोटी ७१ लाख ५८ हजार २०रुपये सर्वाधिक थकीत होते. तर त्या पाठोपाठ जवाहर कारखान्याने ११ लाख ७३ हजार ६७६मे. टन ऊस गाळप केले होते. यापोटी ४४ कोटी ५९ लाख ९६ हजार ८८० रुपये थकीत आहेत.
हंगाम २००६-०७ मध्ये ३८०च्या दुसºया हप्त्यापोटीचे जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे आजअखेर थकीत
कारखान्याचे नाव हंगामात ऊस गाळप ३८० च्या हप्त्यापोटी
(लाख मे. टन) थकीत रक्कम (कोटीत)
भोगावती, परिते ५,४५,७२४ २०,७३,७५,१२०
मंडलिक, हमीदवाडा ५,२१,४१४ १९,८१,३७,३२०
जवाहर, हुपरी ११,७३,६७६ ४४,५९,९६,८८०
दूधगंगा-वेदगंगा, बिद्री ६,४२,९०० २४,४३,०२,०००
वारणा कारखाना १२,५५,६७९ ४७,७१,५८,०२०
छ. राजाराम, बावडा ३,७५,३४६ १४,२६,३१,४८०
दत्त, शिरोळ १०,२५,२८० ३८,९६,०६,४००
पंचगंगा, इचलकरंजी ६,४३,१९३ २४,४४,१३,३४०
शरद, नरंदे ४,१४,७३३ १५,७५,९८,५४०
डी. वाय. पाटील ३,५५,१५३ १३,४९,५८,१४०
दत्त, आसुर्ले-पोर्ले १,३१,००० ४,९७,८०,०००
गडहिंग्लज ३,७८,३३२ १४,३७,६६,१८०
कुंभी-कासारी, कुडित्रे ५,१४,१६२ १९,५३,८१,५६०
गुरुदत्त, टाकळी ५,६९,९८० २१,६५,९२,४००
दौलत, चंदगड ५,१७,६९५ १९,६७,२४,१००
उदयसिंह गायकवाड, बांबवडे १,९६,२६३ ७,४५,७९,९४०