ऑनलाईन भरूनही पुन्हा थकीत बिले, महावितरणचा सावळागोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 05:55 PM2020-06-24T17:55:00+5:302020-06-24T17:56:34+5:30

महावितरणने केलेल्या आवाहनानुसारच लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन विजेची बिले भरली. कोल्हापूर परिमंडळात २२ हजार ७२८ जणांनी मोबाईलवरून बिल भरले; पण आता त्यांनाही आलेल्या बिलात मागील तीन महिन्यांची थकबाकी दिसत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ह्यमहावितरणह्णच्या या सावळागोंधळामुळे प्रामाणिकपणे बिल भरणारे वैतागले असून, वेळेत बिल भरून मूर्खपणा केला का, असा संतप्त सवाल करू लागले आहेत.

Tired bills again even after filling online, MSEDCL's confusion | ऑनलाईन भरूनही पुन्हा थकीत बिले, महावितरणचा सावळागोंधळ

ऑनलाईन भरूनही पुन्हा थकीत बिले, महावितरणचा सावळागोंधळ

Next
ठळक मुद्देऑनलाईन भरूनही पुन्हा थकीत बिले, महावितरणचा सावळागोंधळएप्रिलनंतरची बिले वाढीव दराने दिल्याची कबुली

कोल्हापूर : महावितरणने केलेल्या आवाहनानुसारच लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन विजेची बिले भरली. कोल्हापूर परिमंडळात २२ हजार ७२८ जणांनी मोबाईलवरून बिल भरले; पण आता त्यांनाही आलेल्या बिलात मागील तीन महिन्यांची थकबाकी दिसत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ह्यमहावितरणह्णच्या या सावळागोंधळामुळे प्रामाणिकपणे बिल भरणारे वैतागले असून, वेळेत बिल भरून मूर्खपणा केला का, असा संतप्त सवाल करू लागले आहेत.

लॉकडाऊनमुळे वीज मीटर रीडिंग, बिलांची छपाई व वाटप या प्रक्रिया थांबवण्यात आल्या होत्या. १ जूनपासून हे सर्व पूर्ववत झाले असून घरोघरी बिल येऊन पडू लागले आहे. एकदम तीन महिन्यांचे बिल हातात पडल्याने बिलावरील आकडा पाहून ग्राहकांमधून तक्रारी वाढू लागल्या आहेत. वाढीव बिलाबरोबरच ऑनलाईन बिल भरणाऱ्यांनाही पुन्हा बिल आले आहे. या संदर्भात अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बिले अचूकच दिली आहेत, तरीदेखील काही त्रुटी राहिल्या असल्यास तक्रार द्या, त्वरित सुधारणा करून देऊ असे सांगितले.

महावितरणच्या म्हणण्यानुसार ३१ मार्चपर्यंतची बिले ही डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळ्याच्या काळातील आहेत, तर त्यानंतरच्या बिलांचे रीडिंग हे जूनमध्ये घेतल्यानंतर वापर वाढल्याचे दिसल्याने युनिट वाढून सरासरीही जास्त आली आहे; त्यामुळे जास्त बिल आले असल्याचा समज ग्राहकांनी करून घेऊ नये.

रीडिंग न पाठवणाऱ्या आणि सरासरीने बिले न भरणाऱ्या ग्राहकांना अडीच महिन्यांचे एकत्रित दिलेले बिल अचूकच आहे, यावर महावितरण ठाम आहे. शंका असल्यास ऑनलाईन पोर्टलवर जाऊन पडताळणी करावी, असा सल्लाही दिला आहे. दरम्यान, मार्चपर्यंतचे बिल डिसेंबर ते फेब्रुवारीच्या सरासरीवर; तर एप्रिल ते मे महिन्यांतील बिल वाढीव दराने केली असल्यानेच बिलात वाढ दिसत असल्याची कबुलीही महावितरणने दिली आहे.

संकेतस्थळावर तपासा बिल

लॉकडाऊन काळातील बिल तपासण्यासाठी महावितरणने महाडिस्काम हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले असून वीज बिलावरील लिंकवर जाऊन ग्राहक क्रमांक टाकून बिल पडताळून पाहावे. बिलावरील रीडिंग व मीटरवरील रीडिंग पडताळून शंका दूर करावी.

स्थिर आकारही वाढला

एक एप्रिलपासून विजेचे नवीन दर लागू झाले आहेत. स्थिर आकारात महापालिकेच्या हद्दीत २०, तर ग्रामीण हद्दीत १० रुपये वाढ झाली आहे. वीज आकारातही १०० युनिटपर्यंत प्रती ४१ पैसे, १०१ ते ३०० युनिटपर्यंत ४७ पैसे इतकी वाढ झाली आहे.

प्रतिक्रिया

लॉकडाऊनमुळे अनेक घटक अडचणीत आले, त्यात महावितरणही आहे. कंपनीला अस्तित्वासाठी कर्ज काढावे लागले आहे. सरकारी कंपनी टिकण्यासाठी वीज ग्राहकांनी बिल भरून सहकार्य करावे.
विकास पुरी, जनसंपर्क अधिकारी, महावितरण कोल्हापूर परिमंडल

Web Title: Tired bills again even after filling online, MSEDCL's confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.