‘लोकमत’चा आज तपपूर्ती वर्धापनदिन..

By admin | Published: August 20, 2016 12:54 AM2016-08-20T00:54:14+5:302016-08-20T00:55:43+5:30

स्नेहमेळाव्याचे आयोजन : धैर्यप्रसाद हॉलमध्ये होणार कार्यक्रम

Today is the anniversary of 'Lokmat'. | ‘लोकमत’चा आज तपपूर्ती वर्धापनदिन..

‘लोकमत’चा आज तपपूर्ती वर्धापनदिन..

Next

कोल्हापूर : वाचकांचा विश्वास आणि पाठबळावर कोल्हापूरमध्ये ‘लोकमत’ आघाडीवर आहे. कोल्हापूरच्या प्रत्येक घटना, घडामोडींचा साक्षीदार होऊन जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांत जागल्याची भूमिका बजाविणाऱ्या ‘लोकमत’चा आज, शनिवारी बारावा वर्धापनदिन सोहळा साजरा होणार आहे. त्यानिमित्त येथील ताराबाई पार्कातील धैर्यप्रसाद हॉलमध्ये सायंकाळी पाच ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत वाचक, हितचिंतक, जाहिरातदार व विक्रेत्यांचा स्नेहमेळावा होणार आहे.
या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन महसूल आणि सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महापौर अश्विनी रामाणे यांच्या हस्ते, तर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक व युवराज छत्रपती संभाजीराजे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तपपूर्ती वर्धापनदिनानिमित्तच्या विशेषांकाचा विषय ‘कोल्हापुरी उद्योग’ असा आहे. वर्धापनदिनानिमित्तचा हा विशेषांक सकाळी साडेनऊ वाजता करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या चरणी अर्पण केला जाणार आहे. महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’ने वाचकांचा विश्वास आणि पाठबळावर राज्यासह कोल्हापूरमध्ये आघाडीवर आहे. ‘लोकमत’ने ‘आता बस्स’च्या माध्यमातून हद्दवाढ, उद्योग-व्यापार, अंबाबाई मंदिर, चित्रनगरी, वाहतुकीची समस्या, थेट पाईपलाईन, आदी प्रश्न लोकप्रतिनिधी व शासनासमोर मांडले; तसेच वाचक, नागरिकांच्या महानगरपालिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तसेच विविध शासकीय कार्यालयांत त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी ‘लोकमत हेल्पलाईन’द्वारे पाठपुरावा केला.
‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमातून शहरातील विविध प्रभागांतील अडचणी मांडल्या. त्यामुळे वर्षानुवर्षांच्या अडचणी, प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या. ‘लोकमत इनिशिएटिव्ह’ अंतर्गत सामाजिक उपक्रमांना बळ दिले आहे. बातम्यांसह ‘सखी मंच’, ‘युवा मंच’, ‘बाल विकास मंच’च्या माध्यमांतून
‘लोकमत’ शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवितो. कोल्हापूरच्या मातीशी नाळ जोडलेल्या ‘लोकमत’चा रोजचा अंक व विविध पुरवण्यांमधून वाचकांना सकस, उत्तम ज्ञान आणि माहिती देण्याचा प्रयत्न राहिला आहे. समाजातील जे चुकीचे आहे, त्यावर प्रहार करतानाच जे चांगले आहे त्याला आवर्जून बळ देण्याची भूमिका ‘लोकमत’ सक्षमपणे बजावीत आहे. त्यामुळे वाचकांचा ‘लोकमत’ला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद व भक्कम पाठबळ मिळत आहे. त्याच्या बळावरच ‘लोकमत’ हा तपपूर्ती वर्धापनदिन सोहळा साजरा करीत आहे. त्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘लोकमत’च्या वाटचालीस बळ द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

विशेषांकाचे
उत्स्फूर्त स्वागत
यावर्षी तपपूर्ती वर्धापनदिनानिमित्त ‘लोकमत’तर्फे ‘कोल्हापुरी उद्योग’ हा विशेषांक प्रसिद्ध झाला आहे. त्यात कोल्हापूरच्या उद्योगविश्वाचा इतिहास, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेण्यात आला आहे. हा विशेषांक गुरुवारपासून वाचकांच्या भेटीला आला असून, त्याचे वाचकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे.


४वेळ : आज, शनिवारी, सायंकाळी ५ ते रात्री ८.३०.
४स्थळ : धैर्यप्रसाद हॉल, ताराबाई पार्क, कोल्हापूर.

Web Title: Today is the anniversary of 'Lokmat'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.