विकास संस्थांचा व्यवसायाभिमुखतेकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 01:13 AM2019-01-21T01:13:22+5:302019-01-21T01:13:26+5:30

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अटल महापणन विकास अभियानांतर्गत जिल्ह्णातील १३६ विकास संस्था व सात खरेदी-विक्री ...

Today, the business-oriented business-oriented | विकास संस्थांचा व्यवसायाभिमुखतेकडे कल

विकास संस्थांचा व्यवसायाभिमुखतेकडे कल

googlenewsNext

राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अटल महापणन विकास अभियानांतर्गत जिल्ह्णातील १३६ विकास संस्था व सात खरेदी-विक्री संघ व्यवसायाभिमुख झाले असून, त्यांनी सुरू केलेल्या विविध उद्योगांत तब्बल १४.६८ कोटींची गुंतवणूक केली आहे. या संस्थांची उलाढालही वाढली असून, त्यामुळे उत्पन्नातही मोठी भर पडली आहे. छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे रोजगार उपलब्ध झालेच; पण संस्थाही सक्षम होण्यास मदत झाली.
डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत अटल महापणन विकास अभियान सुरू केले. सहकार विभागाने आवाहन केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी तालुका निबंधकांच्या माध्यमातून विकास संस्था व खरेदी-विक्री संघांना प्रोत्साहित केले. त्यातून डिसेंबर २०१७ अखेर ८० विकास संस्था, तर सात खरेदी-विक्री संघांनी सहभाग घेतला. त्यांनी मूळ कामाबरोबरच छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले. संस्थांना व्यवसायाची गोडी लागल्याने गेल्या वर्षभरात त्यात वाढ होऊन डिसेंबर २०१८ अखेर १३६ संस्थांनी या अभियानात सहभाग घेतला. या संस्थांनी १३५ रोजगार सुरू केले आहेत.
या संस्था ठरल्या मॉडेल
श्रीराम विकास संस्था, कसबा बावडाने सांस्कृतिक भवन उभे केले. त्यातून वार्षिक १६.०९ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. शेडशाळ ग्रामविकास संस्थेने कन्ट्युल रिन्युएबल प्रा. लि., पुणे या कंपनीशी करार करून सौरऊर्जा निर्मितीचा प्रकल्प पूर्ण केला. प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ‘महावितरण’ला दिली आहे. छत्रपती विकास, उचगाव संस्थेने ‘छत्रपती शुद्ध पेयजल’ एटीएम सुरू केले. त्यातून वार्षिक ३.६० लाखांचे उत्पन्न होते. चंदगड तालुका खरेदी-विक्री संघाने कार्यक्षेत्रातील लोकांना रास्त दरात जीवनाश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी ‘तुलसी बझार’ सुरू केला.
अटल महापणन विकास अभियानाचे यश
विकास संस्था व्यवसायातील गुंतवणूक मिळालेले उत्पन्न निव्वळ नफा प्रकल्प सुरू प्रगतिपथावर
१३६ ११.४६ कोटी ५३.५६ लाख ३९.५० लाख १३६ १००
७ (खरेदी-विक्री संघ) ३.२२ कोटी ५२.७१ लाख १८.५० लाख ३ ४
१४३ १४.६८ कोटी १.०६ कोटी ५८ लाख १३९ १०४

Web Title: Today, the business-oriented business-oriented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.