सोनुर्ली येथे आज लोटांगणाचा जत्रोत्सव
By admin | Published: November 7, 2014 12:35 AM2014-11-07T00:35:41+5:302014-11-07T00:47:34+5:30
लोटांगणाचा नवस
तळवडे : कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील माउलीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या, शुक्रवारी साजरा होणार आहे. हा उत्सव शांततेत पार पाडण्यास प्रशासन सज्ज आहे.
सोनुर्ली येथील श्री देवी माउली जत्रेसाठी सिंधुदुर्ग, गोवा, बेळगाव येथून हजारो भाविक येतात. लोटांगणाची जत्रा म्हणून हा जत्रोत्सव प्रसिद्ध आहे. या जत्रेसाठी यावर्षी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. बांदा तसेच सावंतवाडी बसस्थानकावरून उत्सवासाठी जादा बसेस सोडल्या आहेत. सोनुर्ली ते बांदा व सावंतवाडी असे वेगवेगळे दोन बसथांबे सोनुर्ली येथे आहेत. (प्रतिनिधी)
लोटांगणाचा नवस
हा जत्रोत्सव लोटांगणाचा जत्रोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. हजारो भाविक या जत्रोत्सवात उपस्थित राहून लोटांगण घालून नवस फेडतात. हा सोहळा पाहण्यासारखा असतो. स्त्री, पुरुष एकत्रितरीत्या हा नवस फेडत असतात. आंगणेवाडीच्या भराडीदेवीची यात्रा आणि कुणकेश्वराची यात्रा यांच्यापाठोपाठ या जत्रोत्सवात गर्दी पाहायला मिळते.