तेरा ग्रामपंचायतींना आज संगणक-प्रिंटर प्रदान : कोल्हापुरात समारंभ -सतेज पाटील यांचा स्थानिक निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:00 AM2018-05-31T00:00:04+5:302018-05-31T00:00:04+5:30
‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ने सन्मानित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना आज, गुरुवारी (दि. ३१) आमदार सतेज पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून संगणक व प्रिंटर
कोल्हापूर : ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ने सन्मानित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना आज, गुरुवारी (दि. ३१) आमदार सतेज पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून संगणक व प्रिंटर देण्यात येणार आहे. आमदार पाटील यांच्याच हस्ते सकाळी ११ वाजता शिवाजी उद्यमनगरातील रामभाई सामाणी हॉलमध्ये हा समारंभ होत आहे.
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने गौरविण्यात आलेल्या ग्रामपंचायतींना स्थानिक विकास निधीतून संगणक व प्रिंटर देण्याची घोषणा आमदार पाटील यांनी केली होती. त्यांनी जिल्हा नियोजन विभागाकडे त्याचा पाठपुरावा करून ६ लाख ३६ हजार रुपये मंजूर करून घेतले. त्यातून ही साधने ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहेत.
‘लोकमत’च्या वतीने यावेळी कृतज्ञता म्हणून आमदार पाटील यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. संगणक प्रदान सोहळ्यास ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ज्या ग्रामपंचायतींचा गौरव झाला होता, त्यांनी सरपंच-उपसरपंच व सर्व सदस्यांसह या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार पाटील व लोकमत परिवारातर्फे करण्यात आले आहे.
‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ विजेते
सरपंच आॅफ द इयर - शिरोळ (ता. शिरोळ)
उदयोन्मुख नेतृत्व - गोरंबे (ता. कागल)
प्रशासन-ई प्रशासन - शिरोली पुलाची (ता. हातकणंगले)
जलव्यवस्थापन - सांगरूळ (ता. करवीर)
वीज व्यवस्थापन - किणी (ता. हातकणंगले)
शैक्षणिक सुविधा - मुदाळ (ता. भुदरगड)
स्वच्छता - उत्तूर (ता. आजरा)
पायाभूत सुविधा - नेसरी (ता. गडहिंग्लज)
ग्रामरक्षा - भादवण (ता. आजरा)
आरोग्य - ऐनापूर (ता. गडहिंग्लज)
कृषी, तंत्रज्ञान - गडमुडशिंगी (ता. करवीर)
पर्यावरण - लाटवडे (ता. हातकणंगले)
रोजगार निर्मिती - नांदणी (ता. शिरोळ)