उद्याच्या ‘भारत बंद’साठी इचलकरंजीत आज पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:19 AM2020-12-07T04:19:21+5:302020-12-07T04:19:21+5:30
नव्या कृषी विधेयकातील कृषिविषयक धोरणाविरोधात ८ डिसेंबरला सर्वपक्षीय संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर समाजवादी प्रबोधिनीत शहरातील ...
नव्या कृषी विधेयकातील कृषिविषयक धोरणाविरोधात ८ डिसेंबरला सर्वपक्षीय संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर समाजवादी प्रबोधिनीत शहरातील सर्वपक्षीय कृती समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. माजी खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. अन्नदाता बळिराजासाठी व व्यापाऱ्यांच्या भवितव्यासाठी भारत बंद यशस्वी करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला असून, त्याला प्रतिसाद देत व्यापारी, दुकानदारांना मंगळवारी(दि. ८) एक दिवस आपले सर्व व्यवहार बंद ठेवून भारत बंद मध्ये सहभागी होण्याची विनंती केली जाईल. तसेच वडगाव बाजार समितीतील भाजीपाला सौदेही बंद ठेवण्याचे आवाहन केले जाणार आहे. ही पदयात्रा आज, सोमवारी सायंकाळी पाच वाजता झेंडा चौक येथून सुरू होणार आहे. बैठकीस मदन कारंडे, सदा मलाबादे, महादेव गौड, शिवाजी साळुंखे, जयकुमार कोले, भरमा कांबळे, बजरंग लोणारी, प्रसाद कुलकर्णी, आदी उपस्थित होते.