रयतेच्या राजाला आज मानाचा मुजरा
By admin | Published: June 26, 2014 12:35 AM2014-06-26T00:35:22+5:302014-06-26T00:36:26+5:30
राजर्षी शाहू जयंती : आज विविध कार्यक्रमांचे आयोजन; उपमुख्यमंत्र्यांसह सात मंत्री राहणार उपस्थित
कोल्हापूर : रयतेचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १४० वी जयंती उद्या, गुरुवारी साजरी होत आहे. यानिमित्त शासकीय कार्यालयांसोबतच विविध पक्ष, संघटना, संस्थांच्यावतीने सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शासनाच्यावतीने उद्या सकाळी साडेआठ वाजता कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ येथे शाहू महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे.
शाहू स्मारक ट्रस्ट
राजर्षी शाहू छत्रपती स्मारक ट्रस्टच्या वतीने सकाळी ९ वाजता दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण केला जाईल. संध्याकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवन येथे शाहू जयंतीचा मुख्य सोहळा होणार आहे. यावेळी हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांना श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते राजर्षी शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील असतील.
प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग
शिवाजी विद्यापीठ व श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस यांच्या विद्यमाने राजर्षी शाहू छत्रपती व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. बोर्डिंग हाऊस हॉलमध्ये सकाळी साडेनऊ वाजता ज्येष्ठ विचारवंत डॉ. आर. बी. जाधव यांचे ‘आजच्या संदर्भात शाहू छत्रपतींचे विचार’ या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी.बी. पाटील असतील.
कनवा
करवीर नगर वाचन मंदिर येथे सकाळी साडेनऊ वाजता महालक्ष्मी धर्मशाळेचे अध्यक्ष नंदकुमार मराठे यांचे व्याख्यान होणार आहे. छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक धोरण या विषयावर ते विवेचन करतील.
सुसंस्कार शिक्षण मंडळ
सुसंस्कार शिक्षण मंडळ
शाखा समूह व राजर्षी शाहू
महाराज वाचनालयाच्यावतीने कदमवाडी भोसलेवाडी येथील वाचनालयात सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास डॉ. राजन गवस हे प्रमुख वक्ते असतील. अध्यक्षस्थानी युवराज संभाजीराजे असतील.