कोंडी फोडण्यासाठी आज महागोलमेज परिषद

By admin | Published: April 19, 2017 01:09 AM2017-04-19T01:09:12+5:302017-04-19T01:09:12+5:30

मराठा आरक्षण प्रश्न : सकल मराठा समाज; संपूर्ण राज्याचे लक्ष

Today the Mahogolmej Council to break the dilemma | कोंडी फोडण्यासाठी आज महागोलमेज परिषद

कोंडी फोडण्यासाठी आज महागोलमेज परिषद

Next

कोल्हापूर : सकल मराठा समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी आज, बुधवारी आयोजित केलेल्या महागोलमेज परिषदेची तयारी पूर्ण झाली असून, या परिषदेतून मराठा न्यायहक्कासाठी कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परिषदेसाठी राज्याच्या विविध भागातून सुमारे ५०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यातून मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याने याकडे साऱ्या राज्याच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
आज, बुधवारी सकाळी साडेदहा वाजता येथील मार्केट यार्डमधील मुस्कान लॉनमध्ये या महागोलमेज परिषदेला प्रारंभ होणार असून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही परिषद चालणार आहे. या परिषदेतून मराठा समाजाचे न्यायहक्क मांडण्यासाठी ५० जणांचे नेतृत्व उभे केले जाणार आहे. या परिषदेसाठी राज्याच्या विविध भागातून रात्री उशिरापर्यंत सुमारे १०० हून अधिक प्रतिनिधी कोल्हापुरात दाखल झाले. क्षत्रिय मराठा चेंबर आॅफ कॉमर्सने या महागोलमेज परिषदेसाठी पुढाकार घेतला आहे.
सकल मराठा समाजाने आपल्या न्यायहक्कासाठी महाराष्ट्र व इतर राज्यांत लाखोंच्या संख्येने शांततेत सुमारे ५८ मूक मोर्चे काढले; पण शासनाने कोणतेही ठोस निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील सकल मराठा समाज एकत्र येऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी या परिषदेचे आयोजन केले आहे. या महागोलमेज परिषदेत दिवसभर चर्चा, ठराव, निर्णय, कृती व कार्यक्रम ठरविला जाणार आहे. (प्रतिनिधी)

आंदोलनाची पुढील दिशा ठरणार
या महागोलमेज परिषदेतून सुमारे ५० जणांचे नेतृत्व निर्माण करण्यात येणार आहे. राज्यातील पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असून, त्याची ठिणगी कोल्हापुरात या महागोलमेज परिषदेतून पडणार आहे.

Web Title: Today the Mahogolmej Council to break the dilemma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.