सरकारी कर्मचाऱ्यांचा आज राष्ट्रीय विरोधी दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:17 AM2021-07-15T04:17:24+5:302021-07-15T04:17:24+5:30
कोल्हापूर : प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने आज, गुरुवारी ‘राष्ट्रीय विरोध दिन’ पाळून दुपारच्या सुटीत सर्व कर्मचारी ...
कोल्हापूर : प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने आज, गुरुवारी ‘राष्ट्रीय विरोध दिन’ पाळून दुपारच्या सुटीत सर्व कर्मचारी आपापल्या कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत. त्यानंतर मध्यवर्ती कर्मचारी संघटना जिल्हा शाखेचे मोजकेच पदाधिकारी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करणार आहेत.
प्रलंबित मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार देशातील २९ राज्यातील ८० लाख राज्य सरकारी कर्मचारी ‘ राष्ट्रीय विरोध दिन ’ पाळून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी याना निवेदन सादर करून त्याची प्रत मुख्यमंत्री महोदयांना सादर करतील. कोल्हापूरात कोविड परिस्थितीचा विचार करुन कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत कार्यालयीन वेळेपूर्वी अगर दुपारच्या सुटीत आपआपल्या कार्यालयासमोर निदर्शने करणार असल्याचे पत्रक संघटनेचे सरचिटणीस अनिल लवेकर यांनी प्रसिद्धीस दिले आहेत.