आम्ही जगाचे कैवारी कादंबरीचे आज प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:17 AM2021-07-15T04:17:45+5:302021-07-15T04:17:45+5:30

कोल्हापूर : विजय शहाजी पाटील लिखित आम्ही जगाचे कैवारी या कादंबरीचा ऑनलाईन प्रकाशन समारंभ गुरूवारी सायंकाळी साडे चार वाजता ...

Today we publish the world's heroic novels | आम्ही जगाचे कैवारी कादंबरीचे आज प्रकाशन

आम्ही जगाचे कैवारी कादंबरीचे आज प्रकाशन

googlenewsNext

कोल्हापूर : विजय शहाजी पाटील लिखित आम्ही जगाचे कैवारी या कादंबरीचा ऑनलाईन प्रकाशन समारंभ गुरूवारी सायंकाळी साडे चार वाजता वाचनकट्टा या फेसबुक पेजवर होणार आहे. हा कार्यक्रम शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली व मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. संत साहित्याचे अभ्यासक इंद्रजित देशमुख हे प्रमुख वक्ते असतील.

ही कादंबरी ग्रामीण जीवनातील संघर्षावर आधारित असून गणपत आणि सदा या दोन जीवाभावाच्या शेतकरी मित्रांची ही कहाणी आहे. समाजात अनेक लोकांना सगळी सुखं मिळतात तर अनेकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या पासून वंचित राहावे लागते. माझी पिढी कष्टात गेली तरी पुढच्या पिढीला हे सहन करावे लागू नये या ध्येयाने प्रेरित झालेल्या नायकाची ही संघर्षकथा आहे. तरी पुस्तकप्रेमींनी या ऑनलाईन कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

---

पुस्तकाचे मुखपृष्ठ १४०७२०२१-कोल-बुक या नावाने सेव्ह

----

Web Title: Today we publish the world's heroic novels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.