शिरोलीत आज कुस्ती मैदान
By admin | Published: April 30, 2015 09:19 PM2015-04-30T21:19:07+5:302015-05-01T00:19:12+5:30
दोन आणि तीन नंबरची कुस्ती प्रत्येकी चाळीस हजार रुपयांची
शिरोली : येथील काशिलिंग बिरदेव यात्रा आणि पीर अहमदसोा, बालेचाँदसोा उरुसानिमित्त ग्रामपंचायतीने आज, शुक्रवारी येथे कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकाची ५१ हजारांची कुस्ती शाहू साखर कारखान्याचा संतोष दोरवड आणि मामासाहेब मोहळ कुस्ती केंद्र, पुण्याचा सतीश सूर्यवंशी याच्यात होणार आहे. शिरोलीत यात्रा आणि उरुसानिमित्त प्रत्येकवर्षी कुस्त्यांचे जंगी मैदान होते. यासाठी आमदार महादेवराव महाडिक यांची मोठी देणगी असते. दोन आणि तीन नंबरची कुस्ती प्रत्येकी चाळीस हजार रुपयांची मोतीबागचा पै. विजय पाटील व गारगोटी येथील पै. समीर देसाई, आणि पै. संतोष लवटे विरुद्ध पै. नाथा पालवे, तर चौथ्या क्रमांकाची कुस्ती संग्राम भुयेकर आणि विनोद शिंदे, पाचव्या क्रमांकाची कुस्ती शिरोलीचा लखन घाटगे आणि विशाल पाटील यांच्यात होणार असून लहान मोठ्या ५१ कुस्त्या होणार आहेत.यामैदानाचे उद्घाटन आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते होणार असून, बक्षीस वितरण आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते होणार आहे. मैदानात पंच म्हणून गोविंद घाटगे, नामदेव पाटील, बाळासाहेब व्हनागडे, राजाराम सोडगे, गंगाराम पुजारी, हिम्मत भालदार उपस्थित राहणार आहेत, तर राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते पै. राम सारंग मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत यासाठी उद्योजक सलीम महात, तुकाराम पाटील, दिलीप पाटील, पंडित खवरे, शशिकांत खवरे, धुळाप्पा पुजारी, राजू चौगुले, विजय जाधव, शिवाजी खवरे, डॉ. सुभाष पाटील, अनिल खवरे, सुरेश यादव, सागर कौंदाडे, बाबासाहेब कांबळे, आदी, उपस्थित राहणार आहेत.(वार्ताहर)