‘स्वाभिमानी’ची आज जयसिंगपुरात ऊस परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:10 PM2018-10-26T23:10:38+5:302018-10-26T23:11:09+5:30

जयसिंगपूर : खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ची आज, श्ािनवारी १७ वी ऊस परिषद होत आहे. यंदाच्या ...

Today's association of 'Swabhimani' on the occasion of Jai Singhpura Ush Parishad | ‘स्वाभिमानी’ची आज जयसिंगपुरात ऊस परिषद

‘स्वाभिमानी’ची आज जयसिंगपुरात ऊस परिषद

Next

जयसिंगपूर : खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ची आज, श्ािनवारी १७ वी ऊस परिषद होत आहे. यंदाच्या हंगामात कोणता दर असावा, याबाबतची मागणी या परिषदेत केली जाणार आहे. त्यामुळे या परिषदेत होणाऱ्या निर्णयाकडे ऊस उत्पादक शेतकºयांच्या नजरा लागल्या आहेत.
येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर ही ऊस परिषद होत असून, त्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. याठिकाणी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. महिलांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
२५ जिल्ह्यांत बैठकांद्वारे शेतकºयांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. कोल्हापूर वगळता जयसिंगपूर येथे आतापर्यंत १५ ऊस परिषदा झाल्या आहेत. १७व्या ऊस परिषदेच्या निमित्ताने हिशोबपूर्ण ऊसदराची मागणी ‘स्वाभिमानी’ या परिषदेत करणार आहे. उसाचा दर ठरविण्याचा अधिकार फक्त स्वाभिमानीलाच आहे, असे जाहीर करून शासनाने फक्त मध्यस्थाचे काम करावे, अशी भूमिका स्वाभिमानीच्या नेत्यांनी स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार आहेत. दुपारी दोन वाजता परिषदेला सुरुवात होणार आहे. खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांच्यासह राज्यभरातील संघटनेचे प्रमुख पदाधिकारी शेतकºयांच्या प्रश्नावर कोणता हल्लाबोल करतात याकडे शेतकºयांचे लक्ष लागून राहिले आहे.
अंतिम बिलाचा हिशोब द्या : धनंजय चुडमुंगे
शेतकरी चळवळीवर मोठे झालेले नेते एफआरपी अधिक काही रक्कम मागून स्वस्थ बसतात. मात्र, अंतिम बिलाबाबत बोलत नाहीत. त्यामुळे गत हंगामातील अंतिम बिलाचा हिशोब दिल्याशिवाय चालू गळीत हंगाम सुरू करू देणार नाही. ऊसदराबाबत सर्किट हाऊसमध्ये चर्चेच्या नावावर शेतकºयांची फसगत होते. त्यामुळे सर्व संघटनांना एकत्रित करून सर्किट हाऊसमध्ये होणारी बैठक उधळून लावू, असा इशारा ‘आंदोलन अंकुश’चे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांनी दिला.

Web Title: Today's association of 'Swabhimani' on the occasion of Jai Singhpura Ush Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.