हाळवणकर उमेदवारीबाबत उच्च न्यायालयात आज निर्णय
By admin | Published: September 23, 2014 11:10 PM2014-09-23T23:10:07+5:302014-09-23T23:53:32+5:30
उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
इचलकरंजी : येथील भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांचे विधानसभा सदस्यत्व अबाधित ठेवण्याबरोबर त्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसंदर्भातील निर्णयाविषयी आज, मंगळवारी उच्च न्यायालयातील सुनावणी अपूर्ण राहिली. उर्वरित सुनावणी व निकाल उद्या, बुधवारी होणार आहे.वीजचोरी प्रकरणात आमदार हाळवणकर यांना येथील जिल्हा न्यायालयाने सुनावलेला तीन वर्षांचा तुरुंगवास व दहा हजार रुपये दंडाच्या शिक्षेमुळे राज्यपालांनी त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्दबातल ठरविले आहे. ही शिक्षा व विधानसभा सदस्यत्व प्रकरणी आमदार हाळवणकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. याबाबत न्यायाधीश अभय ओक व गिरीष कुलकर्णी यांच्यासमोर आज सायंकाळी चार वाजता झालेल्या सुनावणीमध्ये हाळवणकर यांचे वकील अॅड. नितीन प्रधान व अॅडव्होकेट जनरल डी. जे. खंबाटा यांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले.