आजऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष -नगरपंचायतीचा उद्या निकाल : मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:32 AM2018-04-11T00:32:17+5:302018-04-11T00:32:17+5:30

कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आजरा नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल उद्या, गुरुवारी लागणार आहे. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यासह स्थानिक मातब्बर

 Today's district attention - Nagarpanchayat tomorrow's result: Matibhara's reputation will be recognized | आजऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष -नगरपंचायतीचा उद्या निकाल : मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला

आजऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष -नगरपंचायतीचा उद्या निकाल : मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला

Next

कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आजरा नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल उद्या, गुरुवारी लागणार आहे. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यासह स्थानिक मातब्बर नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. नगराध्यक्षपदासाठी तीन, तर नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी १९ अपक्षांसह ७० उमेदवारांचे भवितव्य उद्या, गुरुवारी कळणार आहे.

या निवडणुकीत थेट भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढली गेली नसली तरी भाजपच्या नेत्यांच्या पाठबळावर आजरा साखर कारखान्याचे चेअरमन अशोक चराटी हे निवडणुकीच्या रिंंगणात उतरले. नगर पंचायत मंजूर करून आणण्यासाठी केलेले प्रयत्न ही जमेची बाजू असल्याने त्यांनी कन्या ज्योत्स्ना चराटी-पाटील यांनाच थेट नगराध्यक्षाच्या जागेसाठी उतरविले. प्रत्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील आजºयात आले नसले तरी त्यांनी आपले पाठबळ चराटी यांच्या पाठीशी लावले. आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक, बाबा देसाई यांनी प्रचारसभा घेतल्या.

दुसरीकडे, जिल्हा परिषदेचे सदस्य जयवंतराव शिंपी यांनी पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य अलका शिंपी यांना थेट नगराध्यक्षपदासाठी रिंंगणात आणून कॉँग्रेसला सोबत घेताना शिवसेनेतील एक गटही आपल्यासोबत ठेवला. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील या दोन माजी मंत्र्यांचे किती सख्य आहे हे यानिमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले. या दोघांनीही आजºयात परस्पर सामंजस्याने जागा लढविल्या. या दोघांसह के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांनी प्रचारसभांचा धडाका लावला.

जितेंद्र आव्हाडांसारखा आक्रमक नेता प्रचारासाठी आणला.अनपेक्षितपणे माजी सरपंच आणि आजरा साखर कारखान्याचे संचालक भाजपचे जनार्दन ऊर्फ जितू टोपले यांनी बंडाचा झेंडा उभारून सर्व मुस्लिम नेत्यांच्या मदतीने तिसºया आघाडीची मोट बांधली. टोपले यांच्या पत्नी माजी उपसरपंच स्मिता टोपले या रिंंगणात आहेत. उशिरा का होईना, आपल्या विधानसभेची काळजी करीत आमदार प्रकाश आबिटकर यांनी या आघाडीला बळ देण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर अर्जुन आबिटकर यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह आजºयात तळ ठोकला. आबिटकर आणि टोपले यांनी नेटाने प्रचारयंत्रणा राबवीत आव्हान निर्माण केले.
गुरुवारी लागणारा निकाल हा तालुक्याच्या आगामी राजकारणाची दिशा ठरविणारा आहे. सध्या चराटी आणि शिंपी यांनी नगराध्यक्षपदासह बहुमत मिळविणार असल्याचे दावे केले असून, तिसरी परिवर्तन आघाडी धक्कादायक भूमिकेत असेल, असा आत्मविश्वास टोपले यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे गुरुवारच्या या निकालाचे औत्सुक्य वाढले आहे.

Web Title:  Today's district attention - Nagarpanchayat tomorrow's result: Matibhara's reputation will be recognized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.