‘लोकमत-पुणे प्रॉपर्टी शोकेस’चे आज उद्घाटन

By admin | Published: March 12, 2016 12:39 AM2016-03-12T00:39:16+5:302016-03-12T00:43:46+5:30

कोल्हापूरकरांना सुवर्णसंधी; पुण्यातील नामवंत बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग

Today's inauguration of 'Lokmat-Pune Property Showcase' | ‘लोकमत-पुणे प्रॉपर्टी शोकेस’चे आज उद्घाटन

‘लोकमत-पुणे प्रॉपर्टी शोकेस’चे आज उद्घाटन

Next

कोल्हापूर : ‘स्मार्ट सिटी’ पुण्यात आपले घर असावे, अशी अनेकांची इच्छा असते. कोल्हापूरकरांच्या या इच्छेला मूर्त रूप देण्याची संधी ‘लोकमत’ने ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस-२०१६’ या गृहप्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. कोल्हापुरातील या प्रदर्शनात पुण्यातील नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे उदघाटन आज, शनिवारी सकाळी दहा वाजता आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष महेश यादव प्रमुख उपस्थित असतील.
हे प्रदर्शन आज, शनिवारी व उद्या रविवारी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनात पुण्यातील २० बांधकाम व्यावसायिकांचे १३५ हून अधिक गृहप्रकल्प कोल्हापूरकरांना पाहता येणार आहेत. त्यात अ‍ॅफोर्डेबल होम्स, लक्झुरिअस होम्स, व्यावसायिक प्रकल्प, ओपन प्लॉट असे प्रॉपर्टीमधील गुंतवणुकीसाठीचे अनेक पर्याय यावेळी पाहता येतील. या प्रदर्शनासाठी व्यावसायिकांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक योजना आखल्या आहेत़ त्यांचाही लाभ या भेट देणाऱ्यांना मिळणार आहे़ पुण्यातील गृहप्रकल्पांची सखोल व सविस्तर माहिती मिळण्याची वर्षातील एकमेव संधी कोल्हापूरकरांना या प्रदर्शनातून उपलब्ध झाली आहे.


चला, वेळेसह पैसे वाचवा!
प्रदर्शनात पुणे, पिंपरी-चिंचवड, सिंहगड रस्ता, सातारा, नाशिक, नगर व सोलापूर रस्ता, पुणे-मुंबई हायवे या परिसरासह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांची माहिती ‘एकाच छताखाली’ मिळणार असल्याने वेळेची व पैशांची बचत होणार आहे़ तरी इच्छुक नागरिकांनी या भव्य प्रदर्शनाला भेट देऊन तसेच आगामी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या गृहस्वप्नांची पूर्तता करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Today's inauguration of 'Lokmat-Pune Property Showcase'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.