‘लोकमत मिशन अॅडमिशन’ आजपासून
By Admin | Published: March 18, 2017 01:10 AM2017-03-18T01:10:10+5:302017-03-18T01:10:10+5:30
एकाच छताखाली माहिती : तीन दिवसांचे प्रदर्शन; जिल्ह्यातील नामवंत शाळांचा सहभाग
कोल्हापूर : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश निश्चित करण्यासाठी चांगली शाळा कोणती, शाळेची वैशिष्ट्ये काय, या गोष्टी शोधताना पालकांची चांगलीच तारांबळ उडते. त्यांची हीच धावपळ कमी करण्यासाठी पालकांना सर्व नामवंत शाळांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. आपण सारेच आतुरतेने वाट पाहत असलेल्या ‘लोकमत मिशन अॅडमिशन २०१७ व समर कॅम्प एक्स्पो’ला आज, शनिवारपासून भव्य प्रारंभ होत
आहे.
राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डायस अकॅडमीच्या सीईओ दिशा पाटील, विबग्योर हायचे प्रिन्सिपॉल टी. बालन, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी प्रमुख उपस्थित असतील. सोमवार (दि. २०)पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचे प्रायोजक डायस अकॅडमी व पॉवर्ड बाय विबग्योर हाय. तर सहप्रायोजक महावीर एज्युकेशन सोसायटी हे आहेत.
प्रदर्शनामध्ये कोल्हापूर जिल्ह्णातील नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या शाळाप्रवेशाची सर्वांगीण माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. परीक्षा संपल्यानंतर मार्चअखेरीस मुलांच्या प्रवेशासाठी सोयीस्कर ठरणाऱ्या शाळांची माहिती घेण्यासाठी पालकांची धावपळ सुरू होते. त्यासाठी त्यांना शाळांची शोधाशोध करावी लागते; पण, ‘लोकमत मिशन अॅडमिशन २०१७ व समर कॅम्प एक्स्पो’ या प्रदर्शनामुळे यावर्षी पालकांची धावपळ थांबणार आहे. शिवाय त्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत होणार आहे.
नामवंत शाळांची माहिती, त्यांचा फीचा पॅटर्न कसा आहे, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ती शाळा नेमके काय प्रयत्न करते, यापासून शाळेतील भौतिक सोयी-सुविधांची माहितीही तुम्हाला मिळू शकेलच; शिवाय त्या शाळेच्या प्रतिनिधींशी तुम्हाला समोरासमोर बसून शाळेबाबत सविस्तर माहिती व चर्चाही करता येणार आहे.
यासह आपल्या पाल्यांच्या शाळेमध्ये बदल करू पाहणाऱ्या पालकांनाही अन्य शाळांबाबत माहिती घेता येणार आहे. यामुळे पाल्यासाठी उत्तम शाळेचा पर्याय निवडण्यास पालकांना नक्कीच मदत होणार
आहे. (प्रतिनिधी)
शाळेतील भौतिक सोयी-सुविधांची माहिती
‘फी’चा पॅटर्न कळणार
शाळेच्या प्रतिनिधींशी समोरासमोर चर्चा
जागेवरच प्रवेश निश्चित करण्याची संधी
राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे भरविण्यात आलेले हे प्रदर्शन आज, शनिवार ते सोमवार (दि. २०) पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत खुले राहणार आहे. तरी पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे.