लोकप्रतिनिधींसमवेत कॉरिडॉरसंबंधी आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2016 12:32 AM2016-09-18T00:32:50+5:302016-09-18T00:36:30+5:30

‘स्मॅक’चा पुढाकार : आंदोलनाची दिशा ठरणार

Today's meeting with Corridor of the People's Representatives | लोकप्रतिनिधींसमवेत कॉरिडॉरसंबंधी आज बैठक

लोकप्रतिनिधींसमवेत कॉरिडॉरसंबंधी आज बैठक

Next

कोल्हापूर : मुंबई-बंगलोर कॉरिडॉर आणि कऱ्हाड-बेळगाव रेल्वेमार्ग हे प्रकल्प कोल्हापूरच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरणारे आहेत. यातून कोल्हापूरला वगळल्याने त्याचा फटका जिल्ह्याच्या विकासाला बसणार आहे. त्या दोन्ही प्रकल्पांमध्ये कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज, रविवारी दुपारी तीन वाजता बैठक होत आहे. शिरोली औद्योगिक वसाहतीतील स्मॅकच्या सभागृहात ही बैठक होत असून, त्यास जिल्ह्यातील खासदार व आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (स्मॅक) अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी केले आहे.
संबंधित दोन्ही प्रकल्पांमध्ये कोल्हापूरचा समावेश व्हावा, अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील उद्योजकांनी संघटितपणे शुक्रवारी केली होती. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारकडे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ही बैठक होत आहे.
कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणि रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध करून देणाऱ्या मुंबई-बंगलोर कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळले आहे. औद्योगिकदृष्ट्या विकसित असलेल्या कोल्हापूरऐवजी अविकसित असणाऱ्या आणि उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा नसलेल्या भागातून हा कॉरिडॉर नेणे अयोग्य आहे. यातून या प्रकल्पांच्या अडचणी वाढणार आहेत. कऱ्हाड-बेळगाव रेल्वेमार्गातून कोल्हापूरला
बगल दिली आहे. या महत्त्वपूर्ण दोन्ही प्रकल्पांतून कोल्हापूरला वगळल्यास येथील औद्योगिक विकास ठप्प होणार
आहे. कोल्हापूरवर एक प्रकारे संकट आले असून, ते परतावून लावण्यासह या प्रकल्पांमध्ये कोल्हापूरच्या समावेशासाठी
हा लढा सुरू होत आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Today's meeting with Corridor of the People's Representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.