दहावी, बारावीची आज ‘आॅक्टोबर’ परीक्षा
By admin | Published: September 25, 2014 11:06 PM2014-09-25T23:06:10+5:302014-09-25T23:29:00+5:30
उद्या, शुक्रवारपासून दि. ११ आॅक्टोबरपर्यंत दहावीची आणि दि. २० आॅक्टोबरदरम्यान बारावीची परीक्षा चालणार आहे.
कोल्हापूर : दहावी, बारावीच्या आॅक्टोबरच्या परीक्षेला उद्या, शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २१ केंद्रांवर दहावीची, तर १० केंद्रांवर बारावीची परीक्षा होणार आहे.या परीक्षेची तयारी कोल्हापूर विभागीय मंडळाने केली आहे. उद्या, शुक्रवारपासून दि. ११ आॅक्टोबरपर्यंत दहावीची आणि दि. २० आॅक्टोबरदरम्यान बारावीची परीक्षा चालणार आहे. विभागीय मंडळांतर्गत असलेल्या कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतून दहावीचे १२ हजार आणि बारावीचे १० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी तिन्ही जिल्ह्यांत भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. त्यात माध्यमिक शिक्षण, शिक्षण उपसंचालक, सहायक शिक्षण उपसंचालक या विभागांच्या चार पथकांचा समावेश आहे. परीक्षेबाबत विद्यार्थी, पालकांना मदतीची आवश्यकता असल्यास अथवा शंका निरसनासाठी कोल्हापूर विभागीय मंडळाने नियुक्त केलेल्या समुपदेशकांशी संपर्क साधावा. समुपदेशनाची सुविधा शुक्रवारपासून दि. १८ आॅक्टोबरपर्यंत राहणार आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव शरद गोसावी यांनी दिली. (प्रतिनिधी)
समुपदेशक असे...
कोल्हापूर : एम. एन. तोरगलकर (९८५०८८९७९९), सांगली : नेहा वाटवे (९८५००५७६३०), सातारा : अंकुश डांगे (९८२२२२००४१), कोल्हापूर विभागीय मंडळ : (०२३१-२६९६१०१,०२, ०३ आणि २६९१४०५)