‘आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स’तर्फे आज रंकाळ्याचे सर्वेक्षण--लोकमत इफेक्ट

By Admin | Published: February 13, 2015 12:35 AM2015-02-13T00:35:12+5:302015-02-13T00:45:27+5:30

रंकाळ्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने सातत्याने परखड लिखाण करीत जागृती केली

Today's Rank Survey - 'Lokmat Effect' by 'Architects & Engineers' | ‘आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स’तर्फे आज रंकाळ्याचे सर्वेक्षण--लोकमत इफेक्ट

‘आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स’तर्फे आज रंकाळ्याचे सर्वेक्षण--लोकमत इफेक्ट

googlenewsNext

कोल्हापूर : शहराचे ऐतिहासिक सौंदर्य असलेला रंकाळा पर्यावरण व भौतिकदृष्ट्या नाश पावत आहे. रंकाळ्याची दुरवस्था दूर करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान पुरविण्याची तयारी असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अ‍ॅँड इंजिनिअर्स (कोल्हापूर) या बांधकाम क्षेत्रातील अग्रणी संस्थेने केली आहे. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व संस्थेचे पदाधिकारी आज, शुक्रवारी साडेनऊ वाजता रंकाळा संवर्धनासाठी आवश्यक कारणांचा शोध घेण्यासाठी संयुक्त पाहणी करणार आहेत. रंकाळ्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा करून जागृती केल्याबद्दल असोसिएशनने ‘लोकमत’चे खास अभिनंदन केले.
गेल्या वर्षभरात रंकाळ्याची संरक्षक भिंत चारवेळा कोसळली. आणखी ७० ते ८० फुटांची भिंत कोसळण्याच्या मार्गावर आहे. पावसाळ्यापूर्वी ही संपूर्ण भिंत दुरुस्त न केल्यास रंकाळ्याचे पाणी बाहेर पडण्याचा धोका आहे. पाण्यातील काम करण्याचे तंत्रज्ञान महापालिकेजवळ नाही. दूषित पाणी मिसळल्याने प्रदूषणाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रंकाळ्याच्या संपूर्ण नैसर्गिक पुनर्भरणाची गरज आहे. महापालिकेने आजपर्यंत रंकाळा संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. मात्र, रंकाळ्याचे दुखणे ‘जैसे थे’ आहे. आता महापालिका तज्ज्ञांकडून १६ लाख रुपयांचा विकास आराखडा तयार करणार आहे. पालिका प्रशासनाकडे याबाबतचे पुरेसे तंत्रज्ञान नसल्यानेच रंकाळ्याला अवकळा आली आहे.
रंकाळ्याचे कोणत्याही परिस्थितीत पुनरुज्जीवन झालेच पाहिजे याच उद्देशाने कोल्हापूर येथील असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अ‍ॅँड इंजिनिअर्सने पालिका प्रशासनास मदतीचा हात देऊ केला आहे. यासाठी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची भेट घेतली. यावेळी रंकाळ्याची संयुक्त पाहणी करून सविस्तर सर्वेक्षण अहवाल तयार करण्याचे ठरले.

शहराचे वैभव असलेल्या रंकाळ्याचे संवर्धन होण्यासाठी सविस्तर सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. सर्वेक्षणानंतर असोसिएशनचे पदाधिकारी याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करून आठ दिवसांत महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना सर्वेक्षण अहवाल सादर करणार आहेत. रंकाळा संवर्धनासाठी नेमके काय करणे गरजेचे आहे, हे या सर्वेक्षणानंतर स्पष्ट होईल.
- संदीप घाटगे, अध्यक्ष,
असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अ‍ॅँड इंजिनिअर्स



रंकाळ्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने सातत्याने परखड लिखाण करीत जागृती केली. रंकाळा संवर्धनाचे महत्त्व प्रशासन व नागरिंकांना पटवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, याबाबत असोसिएशनने ‘लोकमत’चे आभार मानले.

Web Title: Today's Rank Survey - 'Lokmat Effect' by 'Architects & Engineers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.