महाराष्ट्र बेसबॉल संघाची आज निवड
By admin | Published: January 7, 2015 10:45 PM2015-01-07T22:45:23+5:302015-01-07T23:55:00+5:30
राज्यस्तरीय स्पर्धा : यजमान सांगलीसह १५ संघांची उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल
सांगली : आक्रमकपणे फटकेबाजी करीत प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवून यजमान सांगली जिल्हा संघासह १५ संघांनी आज उपांत्य फेरीकडे वाटचाल केली़ अनुभवी सातारा, ठाणे व अकोला संघांना मात्र पराभवाचा जोरदार धक्का बसला़
सांगली जिल्हा बेसबॉल असोसिएशन व फिनिक्स स्पोर्टस् अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने नवव्या वरिष्ठ राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये या स्पर्धा सुरू आहेत. नगरसेवक शेखर माने यांनी आज स्पर्धेस सदिच्छा भेट दिली़ स्पर्धा समितीचे सचिव राजेंद्र कदम यांनी त्यांचे स्वागत केले़ सांगली पोलीस दलाचा आंतरराष्ट्रीय धावपटू अनिल ऐनापुरे याचा सत्कार करण्यात आला़ यावेळी राजेंद्र इखणकर, पुरूषोत्तम जगताप, जितेंद्र पाटील, रूक्साना मुलाणी, ज्ञानेश काळे, विजय बोरकर, किरण पवार, आर्यदीप लोंढे, सुरेश हादीमणी, मदन दाभाडे उपस्थित होते़
स्पर्धेचा आजच्या दिवसाचा अंतिम निकाल असा : पुरुष : सांगली विजयी विरुद्ध बीड (४-३), नाशिक वि. वि. अकोला (१-०), वाशिम वि. वि. औरंगाबाद (१०-२), नागपूर वि. वि. ठाणे (४-०), यवतमाळ वि. वि. मुंबई उपनगर (१-१), अमरावती वि. वि. सातारा (१-०), मुंबई शहर वि. वि. सांगली (३-३), जळगाव वि. वि. बुलडाणा (६-०), मुंबई उपनगर वि. वि. कोल्हापूर (९-०), अहमदनगर वि. वि. बुलडाणा (९-१), नागपूर वि. वि. धुळे (४-३), पुणे वि. वि. औरंगाबाद (४-०)़
महिला : पुणे वि. वि. नागपूर (११-११), कोल्हापूर वि. वि. औरंगाबाद (१-०), सोलापूर वि. वि. कोल्हापूर (२-१), नागपूर वि. वि. सांगली (७-१), सोलापूर वि. वि. औरंगाबाद (१-०), रत्नागिरी वि. वि. नागपूर (३-०), सातारा वि. वि. अमरावती (१-१), सोलापूर वि. वि. अमरावती (५-०)़
पंच म्हणून इंद्रजित नितनवार (अमरावती), जयकुमार रामटेके (नागपूर), नारायण बत्तुले (अकोला), संतोष खेंडे (सोलापूर) यांनी काम पाहिले़ खेळाडूंच्या निवास व भोजनाची व्यवस्था संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
या स्पर्धेतून महाराष्ट्राचा बेसबॉल संघ निवडण्यात येणार आहे. हा संघ गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल, असे राजेंद्र कदम यांनी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)
जिल्ह्यात बेसबॉलचा ‘डबलबार’
यापूर्वी जिल्ह्यात २०१३ मध्ये राज्य बेसबॉल स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या होत्या. २०१५ मध्ये जिल्ह्यास पुन्हा एकदा या स्पर्धा आयोजनाचा बहुमान मिळाला़ २०१६ मध्ये जिल्ह्यात राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा आयोजित करणार असल्याचे राजेंद्र कदम यांनी सांगितले.