कागल पंचायत समितीच्या सभापतिपदी तोडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:18+5:302021-07-10T04:17:18+5:30
: कागल पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रमेश आण्णासोा तोडकर ( लिंगणूर दुमाला) ...
: कागल पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रमेश आण्णासोा तोडकर ( लिंगणूर दुमाला) यांची, तर उपसभापतिपदी शिवसेनेच्या मनीषा संग्राम सांवत (बाणगे) यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार शिल्पा ठोकडे होत्या. गटविकासाधिकारी सुशील संसारे उपस्थित होते. निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष केला.
सभापती पूनम महाडिक आणि उपसभापती अंजना सुतार यांनी राजीनामे दिल्याने हा निवडणूक कार्यक्रम लागला होता. पंचायत समितीत सत्तेत असलेल्या मंत्री मुश्रीफ गट आणि खासदार मंडलिक गटात ठरल्याप्रमाणे या निवडी झाल्या. उपसभापती सावंत या माजी आमदार संजय घाटगे गटाच्या सदस्या आहेत. जिल्हा परिषदेचे सदस्य अमरिष घाटगे निवडीवेळी उपस्थित होते. सुरेशराव कुराडे, विजय भोसले, जयदीप पोवार, दीपक सोनार, कमल पाटील, राजश्री माने हे सदस्य तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
● उपसभापती, सभापती
रमेश तोडकर हे निवडणुकीनंतर पहिले उपसभापती झाले आणि आता सभापती झाले आहेत. मनीषा सावंत यांच्या सासू वंदना रमेश सावंत या बाणगे गावच्या सरपंच आहेत.
ग्रामविकास मंत्र्यांनी घेतली बैठक
सभापतिपदासाठी जयदीप पोवार इच्छुक होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी युवराज पाटील, गणपतराव फराकटे, नवीद मुश्रीफ, भय्या माने आदींशी चर्चा करून तोडकर यांचे नाव आज सकाळीच निश्चित केले, तर खासदार संजय मंडलिक यांनी दहा दिवसांपूर्वीच मनीषा सावंत यांचे नाव उपसभापतिपदी निश्चित केले होते. ‘लोकमत’मधून हे वृत्त प्रसिद्धही झाले होते.
फोटो सभापती उपसभापती.