एकत्र कुटुंब पद्धतीत मिळतो नात्यांचा गोडवा-तेलवेकरांच्या तीन पिढ्या नांदताहेत एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:51 AM2019-05-15T00:51:03+5:302019-05-15T00:54:10+5:30

जागतिक कुटुंब दिन आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवून ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब असे तत्त्वज्ञान मांडले जाण्याच्या या नेक्स्ट जनरेशनमध्ये लग्नापूर्वीच मुले-मुली कुटुंबीयांपासून स्वतंत्र होत आहेत. अशा काळातही काही कुटुंबे मात्र, सुसंवाद राखत एकत्र कुटुंब पद्धतीची जपणूक करीत आहेत. आज जागतिक कुटुंब दिन यानिमित्ताने...

Together with the family system, together with three generations of sweetheart-oilweed families | एकत्र कुटुंब पद्धतीत मिळतो नात्यांचा गोडवा-तेलवेकरांच्या तीन पिढ्या नांदताहेत एकत्र

गडहिंग्लज येथील रमेश तेलवेकर यांची कन्या रूपल व उत्तूर येथील प्रशांत दिनकर ढोणुक्षे यांच्या विवाहाप्रसंगी मातोश्री इंदिरा यांच्यासमवेत तेलवेकर कुटुंबीय.

googlenewsNext
ठळक मुद्देकुटुंब न्हालंय सुखात : एकमेकांवर विश्वास, प्रेमाच्या धाग्याची गुंफण; ‘एक चूल, एक पंगत’ तत्त्वाची जपणूकवडगावात ३९ सदस्यांचे मोरे कुटुंबीय

राम मगदूम ।
गडहिंग्लज : केवळ सुसंवादामुळेच तीन पिढ्यांमधील तब्बल २८ माणसं गुण्या-गोविंदाने एकत्र नांदताहेत. एकमेकांवरील विश्वास आणि प्रेमाच्या धाग्यांनीच त्यांना एकत्र घट्ट बांधून ठेवले आहे. एकत्र कुटुंबामुळेच आम्ही आनंदी आहोत, असं सुखात न्हालेल्या येथील तेलवेकर कुटुंबातील प्रत्येकजण अभिमानानं सांगतो.

ज्येष्ठ पंच दिवंगत बाबूराव काळू तेलवेकर तथा ‘आबा’ हे या कुटुंबाचे प्रमुख. त्यांच्या पत्नी इंदिरा या अत्याळमधील मोहिते घराण्यातील. त्यांना अरुण, प्रकाश, सुरेश, रमेश, चंद्रकांत व शशिकांत हे सहा मुलगे, तर कमल, गौराई व रेखा या तीन मुली. त्यांना एकूण दहा मुली व सात मुले आणि दहा नातवंडे आहेत. सुनांनीदेखील एकत्र कुटुंबपद्धती मनापासून स्वीकारली आहे.
१९५०च्या दशकात आबा कागलच्या कोर्टात कारकून म्हणून नोकरीला होते. मात्र, अचानक त्यांची नोकरी गेल्यामुळे ते दु:खी झाले. ज्येष्ठ भगिनी कुसाबाई कळेकर यांनी त्यांना येथील नेहरू चौकात लाकडाची वखार घालून दिली. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी धान्याचा व्यापार सुरू केला. त्यामुळे त्यांची पदवीधर मुलेही व्यापारातच रममाण झाली. १९७० च्या दशकात त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र अरुण यांनी वडिलांच्या नावानेच किराणा मालाचे दुकान सुरू केले. घरातील बाया-माणसांसह सर्वमंडळी रात्रंदिवस राबतात. शेती अन् व्यापारावरच या कुटुंबाने लक्ष केंद्रित केले आहे. आजमितीस शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २ गोदामांसह स्वमालकीच्या जागेत सुसज्ज दुकान आणि १५ एकर शेती इतकी प्रॉपर्टी त्यांनी एकीच्या बळावर कमावली आहे. ‘आबां’ची पदवीधर नातवंडदेखील नोकरीच्या मागे न लागता दुकान व शेतीची जबाबदारी आनंदाने सांभाळत आहेत.

वडगावात ३९ सदस्यांचे मोरे कुटुंबीय

जहाँगीर शेख ।
कागल : सहा वृद्ध भाऊ, त्यांच्या सहा पत्नी, त्यांची मुले, सुना, नातवंडे अशा तीन पिढ्या एकत्र, एकच कुटुंब म्हणून राहतात. तेही एक चूल, एक पंगत या तत्त्वाने. कागल तालुक्यातील कापशी खोऱ्यातील वडगाव या गावातील कै. शंकरराव मोरे यांच्या कुटुंबानेही एकत्रित कुटुंब पद्धतीचा हा वटवृक्ष अजून तरी जपून ठेवला आहे.
मोरे कुटुंबातील शंकर मोरे आणि त्यांच्या पत्नी पार्वती मोरे आज हयात नाहीत. पंधरा आणि वीस वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. या दाम्पत्याला सहा मुले, सहा सुना. अनुक्रमे शांताबाई आप्पासाहेब मोरे, शेवंता श्रीपती मोरे, रंजना शामराव मोरे, वंदना भीमराव मोरे, अलका आण्णासो मोरे, मीना दशरथ मोरे, अशी या दाम्पत्यांची नावे आहेत. सहा भावांची एक बहीण रत्नाबाई आप्पासाहेब पाटील (रा. कणंगला) यातील ज्येष्ठ असणारे आप्पासाहेब यांचे वय आज ८0च्या आसपास, तर शेवटचा नंबर असणाºया दशरथांचे वय ५५ आहे. आप्पासाहेब यांना दोन मुले, दोन सुना आणि सहा नातवंडे, तर दोन्ही मुलींची लग्ने झाली आहेत. श्रीपती यांना एक मुलगा, सून, दोन नातू, एक विवाहित मुलगी आहे. तसेच मनीषा नावाची ३0 वर्षांची एक गतिमंद मुलगी अविवाहित आहे. शामराव यांना दोन मुले, दोन सुना आणि चार नातवंडे व एक विवाहित मुलगी आहे. भीमराव यांना अक्षय नावाचा एकच मुलगा जो सैन्य दलात आहे. आण्णासाहेब यांनाही एक मुलगा, तर दशरथ यांना दोन मुले. हे चारही अजून अविवाहित आहेत. असे हे ३९ सदस्यांचे कुटुंब गेली ८० वर्षे एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहे.


असे आहे मोरे कुटुंब...
शेती हाच मुख्य व्यवसाय. ३० गायींचा गोठा तोही आधुनिक पद्धतीचा. किराणा मालाचे दुकान, एक बैलजोडी, तीन ट्रॅक्टर. गतवर्षी भारती रवींद्र मोरे या सरपंच होत्या. एक जुन्या पद्धतीचे ऐसपैस घर. त्याला लागूनच अलीकडच्या काळात आरसीसी बंगला बांधला आहे. दर दीपावली, गावच्या यात्रेत अख्ख्या कुटुंबाला कपडे खरेदी, दागिनेही समान, मुला-मुलींच्या लग्नात खर्चाचा एकच पॅटर्न, एकच टीव्ही, एकच रिमोट, एकच स्वयंपाकघर, एकच पंगत, आधी बच्चे कंपनी आणि वृद्ध, नंतर पुरुष, मग महिला जेवण करतात.

 

गडहिंग्लज येथे शेती, व्यापारात रमलंय २८ जणांचे कुटुंब
वडिलांनी नाव कमावलं ते टिकून ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. कुटुंबातील प्रत्येक निर्णय आम्ही सर्वजण एकत्र बसूनच घेतो. एकत्र कुटुंबामुळेच आम्ही जीवनात यशस्वी झालो आहोत.
- अरुण बाबूराव तेलवेकर, कुटुंबप्रमुख
 

Web Title: Together with the family system, together with three generations of sweetheart-oilweed families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.