हातकणंगलेत दोन्ही कॉँग्रेस एकत्र
By admin | Published: April 30, 2015 12:40 AM2015-04-30T00:40:13+5:302015-04-30T00:42:54+5:30
जिल्हा बँक : जनसुराज्य पक्षाची गोची
आयुब मुल्ला -खोची -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निमित्ताने कॉँग्रेस-राष्ट्रवादीला तालुक्यात एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. शाहू विकास आघाडीकडून एक जागा बिनविरोध व दोन ठिकाणी उमेदवारी अशी कॉँग्रेसची, तर फक्त एकच जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे; परंतु या आघाडीबरोबर असणाऱ्या जनसुराज्यपक्षाची मात्र गोची झाली आहे. त्यामुळे आवळे यांना मिळून
ते आघाडीधर्म पाळतील का?
याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
शाहू विकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या कोट्यातून महिला गटांतून माजी खासदार निवेदिता माने, अनुसूचित जाती-जमाती गटांतून माजी खासदार जयवंतराव आवळे यांचे पुत्र राजू आवळे, तर इतर मागास गटांतून आवाडे गटाचे विलासराव गाताडे यांना उमेदवारी मिळाली आहे. संस्था गटातून आमदार महाडिक बिनविरोध झाले आहेत. म्हणजे राष्ट्रवादीला एक, तर कॉँग्रेसला तीन जागा असे चित्र निर्माण झाले आहे. विलास गाताडे वगळता वरील तिन्ही नेते बॅँकेचे गेल्यावेळी संचालक होते. विशेष म्हणजे निवेदिता माने अध्यक्ष, तर राजू आवळे उपाध्यक्ष म्हणून पहिल्यादांच त्यांना संधी मिळाली.
गेल्यावेळी निवडणूक चुरशीने झाली होती. ती परिस्थिती सध्या दिसत नाही. कारण माघारीच्या अंतिम दिवशीच चार जागा बिनविरोध झाल्या. महिला गटातील दोन जागाही बिनविरोध होत होत्या. परंतु, माघारीसाठी पंधरा मिनिटे उशीर झाला. त्यामुळे जयश्री रेडेकर (गडहिंग्लज), सुजाता सातवणेकर (चंदगड) यांचे अर्ज राहिले. अन्यथा, निवेदिता माने व उदयानी साळोखे या शाहू विकास आघाडीच्या महिला उमेदवार बिनविरोध झाल्या असत्या.
विशेष म्हणजे विरोधी गटानेच भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर व आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या नेतृत्वाखाली सहा उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये स्वत: मिणचेकर हे अनुसूचित जाती-जमाती गटातून उभे आहेत. तर सुधीर मुंज हे इतर मागास गटांतून उभे आहेत. मिणचेकर यांचे विरोधक राजू आवळे आहेत. तसेच ‘जनसुराज्य’चे विरोधक मिणचेकर व राजू आवळे हे दोघे अहेत. त्यामुळे जनसुराज्य कोणाचे समर्थन करणार? हा प्रश्न आहे. विनय कोरे मात्र शाहू विकास आघाडीबरोबर आहेत. त्यामुळे त्यांना आघाडी म्हणून राजू जयवंतराव आवळे यांचे समर्थन करावे लागेल. अन्यथा, या जागेबाबत काहीही न बोलता ते कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यही देऊ शकतील अशी स्थिती आहे.
या निवडणुकीने जास्त ताणाताण होईल, असे चित्र नाही. दोन्ही
कॉँग्रेस एकत्रित काम करीत
आहेत. परंतु, तालुक्यात मात्र ‘जनसुराज्य’ची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.