मालवाहतूक गाड्यांना प्रति किलोमीटर ६ ते ८ रुपये टोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:29 AM2021-02-25T04:29:43+5:302021-02-25T04:29:43+5:30
सतीश पाटील शिरोली : कोल्हापूर भारतात दोनशे राष्ट्रीय महामार्गावर दोन कोटींहून अधिक माल वाहतूक गाड्या धावत असून प्रत्येभक एक ...
सतीश पाटील
शिरोली : कोल्हापूर
भारतात दोनशे राष्ट्रीय महामार्गावर दोन कोटींहून अधिक माल वाहतूक गाड्या धावत असून प्रत्येभक एक किलोमीटरला सरासरी आठ रुपये इतकी टोल आकारणी ४०० हून अधिक टोल नाक्यावर होत आहे.
देशाचे दळणवळण व्यवस्था सुरळीत चालू राहण्यासाठी
भारतातील ३२ राज्यांत एकूण २०० हून अधिक राष्ट्रीय महामार्ग आहेत. या महामार्गावरून दररोज २ कोटींपेक्षा जास्त वाहने धावतात. ही वाहने मालवाहतूक करताना त्यांना पेट्रोल -डिझेल इंधनाबरोबर टोलचा मोठा फटका बसत आहे. प्रत्येक किलोमीटरला सरासरी सहा ते आठ रलपये टोल आकारणी होते, असे जाणकार व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
गेल्या तीन महिन्यांत डिझेलमध्ये सतत होत असलेल्या दरवाढीमुळे प्रति किलोमीटर अंतराला२८ रुपये इतका खर्च येत होता, तो आता ३२ रूपयांवर पोहोचला आहे. भाडेवाढ किलोमीटरला चार रुपये होणे अपेक्षित आहे.
सध्या देशात फास्टॅग सुरू झाले आहे, पण या फास्टॅगचा बोजवारा उडालेला दिसत आहे.
वाहनधारकांना सध्या फास्टॅगबरोबरच पेट्रोल, डिझेल इंधन दरवाढीचा सर्वांत जास्त फटका बसत आहे. मोठ्या मालवाहतूक गाड्यांना एकाच वेळी टोल आकारणी करावी, अशी मागणी संघटनेच्यावतीने गेल्या पाच वर्षांपासून वारंवार केली आहे, पण ती अद्याप अमलात आणलेली नाही. एकाच वेळी टोलचे पैसे आकारले तर वेळ वाचेल. टोल आकारणीसाठी लागणारी महागडी यंत्रणी कमी होईल. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्यावतीने १४ फेब्रुवारी रोजी केंद्र शासनाला काही मागण्यांचे निवेदन दिले आहे. यात डिझेलवर जीएसटी आकारणी करावी. त्यामुळे संपूर्ण देशात डिझेल दर एकसारखा राहील आणि दरही कमी होतील.
चौकट
एकाच वेळी टोलची रक्कम घ्या
देशातील टोलनाक्यावर वाहनांच्या रांगामुळे होणारा इंधनाचा खर्च याचा अभ्यास करून टोल फ्री इंडियाबाबत देशातील नॅशनल परमिट वाहनांवर वर्षाला एकाच वेळी टोलची रक्कम घ्यावी, अशी मागणी ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस असोसिएशनची आहे.
प्रतिक्रिया
मालवाहतूक गाड्यांना प्रति किलोमीटर अंतराला ६ ते ८ रुपये टोल आकारणी होते. वर्षातून एकदाच टोल आकारणी करावी, अशी मागणी गेल्या पाच वर्षांपासून वारंवार करत आहे, पण शासन आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.
बाबा शिंदे -ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस कमिटी मेंबर पुणे
.........
गेल्या तीन महिन्यांपासून वारंवार डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहनधारकांना मोठा फटका बसत आहे. प्रति किलोमीटर अंतराला चार रुपये इतका खर्च वाढला आहे आणि भाडेवाढ मात्र मिळत नाही. त्यामुळे वाहनधारक अडचणीत आहेत.
प्रकाश गवळी -अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ट्रान्सपोर्ट असोसिएशन सातारा