पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर टोल सुरुच राहणार, दरातही वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 06:05 PM2022-06-24T18:05:51+5:302022-06-24T18:06:22+5:30
जिल्ह्यात नोंदणी असलेल्या व्यावसायिक वाहनांना पन्नास टक्के सवलत देण्यात येणार
संतोष भोसले
किणी (कोल्हापूर) : पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता हातकंणगले )येथील टोल नाक्यावरील टोल वसुली वाढविण्यात आलेली ५३दिवसाची मुदत २४ जूनला संपत असल्याने महामार्ग व टोल नाका राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणानाकडे हस्तांतरीत होऊन टोल वसुली सुरू राहणार आहे तर टोल दरवाढ लागु करण्यात आली असून कार जीप साठी १० रूपये तर ट्रक बस अवघड वाहनांना १५ रूपये दरवाढ करत वाहनधारकांना धक्काच देण्यात आला आहे.
बांधा वापरा या तत्वावर राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्गाचे चौपदरीकरण करून २००५साली किणी व तासवडे (सातारा) येथे टोल नाके उभे करून टोल वसुली सुरू करण्यात आली होती . याची मुदत २ मे २०२२ रोजी संपल्याने कोरोना व महापूर व नोट बंदीच्या बंदच्या कालावधीसाठी ५३ दिवसाची मुदत वाढ देण्यात आली होती.
या मुदतवाढीचा कालावधी २४ जुन रोजी संपणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळा कडून महामार्ग व टोल नाका राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत होणार असुन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने टोल वसुली सुरू करण्यात ठेवण्यात येणार आहे. तर टोल दरवाढ लागु करण्यात येणार असुन कार जीप साठी ८०रूपये ऐवजी ९०रूपये, हालक्या वाहनासाठी १४५ रूपये तर ट्रक बस अवजड वाहनासाठी २८० रूपये ऐवजी ३०५ रूपये ची दर वाढ लागू करण्यात येणार आहे. तर तीन अॅक्सल वाहनधारकांना ३३५ रूपये, चार अॅक्सल वाहनधारकांना ४८०रूपये सात अॅक्सल वाहनधारकांना ५८५ रूपये टोल आकरणी होणार आहे.
जिल्ह्यातील वाहनांना ५० टक्के सवलत
जिल्ह्यात नोंदणी असलेल्या व्यावसायिक वाहनांना पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे. तर २४ तासात रिटर्नच्या प्रवासासाठी दुप्पट ऐवजी दिडपट टोल द्यावा लागणार आहे तर वीस किलोमीटर अंतरातील वाहनधारकांना ३१५मासिक पास सुविधा देणयात अली आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे महामार्गाचे सहापदरीकरण करण्याचे प्रस्तावित आहे त्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे मात्र प्रत्यक्षात सहापदरीकरणाच्य कामाला पावसाळ्यानंतर सुरूवात होईल शक्यता आहे.