तलाठी कार्यालयासमोर पेटविल्या चुली

By admin | Published: August 30, 2016 12:47 AM2016-08-30T00:47:45+5:302016-08-30T00:49:13+5:30

दाखल्यांसाठी आंदोलन : आलासमध्ये प्रश्न न सुटल्याने रात्रीही कष्टकरी शेतमजूर, शेतकरी आंदोलकांचा ठिय्या

Tollyfish opened the front of the office | तलाठी कार्यालयासमोर पेटविल्या चुली

तलाठी कार्यालयासमोर पेटविल्या चुली

Next

बुबनाळ : आलास (ता. शिरोळ) येथील गावकामगार तलाठी कार्यालयावर शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेतर्फे संजय गांधी निराधार योजनेसह विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना २१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्नाचा दाखला मिळावा, या मागणीसाठी लाभार्थ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू केले. सायंकाळी हा प्रश्न सुटला नसल्यामुळे तलाठी कार्यालयासमोरच चुली मांडून स्वयंपाक करण्यात आला. यावेळी शासनाचा निषेध करण्यात आला.
आलास येथील गावकामगार तलाठी कार्यालयावर शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासने यांच्या नेतृत्वाखाली संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी, श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळावा, त्यांना २१ हजार रुपयांचे उत्पन्न दाखले मिळावेत यासाठी वेळोवेळी तलाठी कार्यालयाकडे मागणी करूनही टाळाटाळ करीत आहेत. जे दाखले दिले आहेत, ते दाखले पूर्ण चौकशी न करता दिले आहेत. त्याचबरोबर दारिद्र्यरेषेमधील लोकांचे उत्पन्न दाखलेही वाढीव उत्पन्न करून दिले आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांवर तलाठी कार्यालयाकडून अन्याय झाला आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांची फेरचौकशी करून उत्पन्नाचे दाखले मिळावेत, या मागणीसाठी सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून तलाठी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. कार्यकर्त्यांनी तलाठी कार्यालयासमोर रात्रीच्या जेवणासाठी दगडाच्या चुली मांडून स्वयंपाक केला. आंदोलनकर्ते सर्व दाखले एका वेळीच मिळावेत यावर ठाम असून, यावेळी शासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात सुरेश सासने, जिनपाल कोळी, सिकंदर मुजावर, पद्मावती उपाध्ये, सुशीला उपाध्ये, लीलावती गिताजे, फुलाबाई घुणके, गुणवंती हासुरे, शानाबाई गावडे यांच्यासह लाभार्थी सहभागी झाले होते.
दरम्यान, नृसिंहवाडीचे मंडल अधिकारी ए. डी. पुजारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, शिरोळ तालुका कष्टकरी शेतकरी मजूर संघटना यांनी संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजनेबाबत २१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न दाखला मिळण्यासाठी आलास तलाठी यांच्याकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने पात्र लाभार्थी
आहेत, त्यांचे दाखले तयार केले आहेत.
मुले नोकरी करतात, कुटुंबाच्या व्यक्तीच्या नावाने शेती आहे, त्यामुळे २१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न दाखले देता येत नाहीत; परंतु आंदोलनादिवशी ९० अर्ज दाखल केले आहेत. चौकशी करून पात्र असतील त्यांना १० सप्टेंबरपर्यंत दाखले देण्याची कार्यवाही करीत आहे. परंतु , आताच सगळ्यांनी दाखल्यांची मागणी केल्याने स्थानिक चौकशी केल्याशिवाय ते देता येत नाहीत. (प्रतिनिधी)


आलास (ता. शिरोळ) येथे शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीने शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना २१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्नाचा
दाखला मिळण्यासाठी सोमवारी तलाठी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

Web Title: Tollyfish opened the front of the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.