न्यू एज्युकेशन सोसायटीचा उद्या १०० वा वर्धापनदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:12 AM2021-02-05T07:12:04+5:302021-02-05T07:12:04+5:30
कोल्हापूर : येथील न्यू एज्युकेशन सोसायटीचा १०० वा वर्धापनदिन उद्या सोमवार दि. १ फेब्रुवारी रोजी ...
कोल्हापूर : येथील न्यू एज्युकेशन सोसायटीचा १०० वा वर्धापनदिन उद्या सोमवार दि. १ फेब्रुवारी रोजी असून यानिमित्ताने गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे सचिव प्रभाकर हेरवाडे यांनी ही माहिती दिली. सकाळी ८. ३० वाजता राम गणेश गडकरी सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
कोल्हापूरच्या शैक्षणिक परंपरेमध्ये अव्वल स्थान पटकावलेल्या या संस्थेच्या १०० व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम साऊंड कास्टिंगचे व्यवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे यांच्यासह आमदार चंद्रकांत जाधव आणि आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विनोद लोहिया यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून उपाध्यक्ष अनिल लोहिया, सोसायटीचे अध्यक्ष पदमाकर सप्रे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष नितीन वाडीकर हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या संस्थेची स्थापना १ फेब्रुवारी १९२१ रोजी करण्यात आली. आज कोल्हापूर, जयसिंगपूर, नांदणी, इस्लामपूर येथे स्वमालकीच्या इमारतींमध्ये बालवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, डीटीएड महाविद्यालय, कर्णबधिर विद्यालय, इंग्रजी माध्यम शाळा अशा २२ शाखांच्या माध्यमातून कार्यरत आहे. २० हजार विद्यार्थ्यांचे ५०० हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी भवितव्य घडवित आहेत.
कला, क्रीडा,साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक चमकत असून बहुतांशी शाळा या संगणक प्रयोगशाळांनी सुसज्ज आहे. काही ठिकाणी अटल टिकरिंग लॅब कार्यरत आहेत.
चौकट
संस्थेत घडलेले नामवंत
कविवर्य विं.दा. करंदीकर, कॅप्टन नानिवडकेर, रमेश मंत्री, नरेंदर सीनकर, सरोजिनी बाबर, रविंदर मेस्त्री, डॉ. नितीन कळमकर, यशवंत भालकर, डॉ. धनंजय गुंडे, वसंत पाटील, केंन्दरीय गृहमंत्री अमित शहा यांच्य पत्नी सोनल शहा
चौकट
सांस्कृतिक योगदान
डॉ. वि. भ. व विनोदकुमार लोहिया यांनी मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रात संस्थेची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दोन संगीत नाटकांचे सादरीकर, सी. जी. कुलकर्णी वाडमय चर्चा मंडळातर्फे साहित्यिक उपक्रम ही या संस्थेची वैशिष्ट्ये आहेत.