शिरोळ संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:22 AM2021-03-15T04:22:32+5:302021-03-15T04:22:32+5:30
कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील कन्या शाळेजवळील कूपनलिका गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त झाली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू ...
कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील कन्या शाळेजवळील कूपनलिका गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त झाली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे जनावरांना तसेच दररोज खर्चासाठी येथील ग्रामस्थांना पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे येथील कूपनलिका लवकरात लवकर दुरुस्त करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
---------------------
मातीचे ढिग हटवा
जयसिंगपूर : येथील अकराव्या गल्लीतील आवळेकर हॉस्पिटलसमोर रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, रस्ता करीत असताना याठिकाणी मातीचे ढिग टाकण्यात आले आहेत. हे मातीचे ढिग वाहतुकीस अडथळा होत आहेत. त्यामुळे ते ढिग लवकरात लवकर हटवून रस्ता वाहतुकीस सोयीस्कर करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
-------------------
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
जयसिंगपूर : येथील मटण मार्केट शेजारी असणाऱ्या नाल्यामध्ये मासे, टाकावू मांस मोठ्या प्रमाणात टाकले जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर येत आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रवही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नागरिकांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नाल्यामध्ये मांस टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.