शिरोळ संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:23 AM2021-04-12T04:23:03+5:302021-04-12T04:23:03+5:30
शिरोळ : येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल बबन मोहिते यांची भीम कायदा सामाजिक संघटनेच्या शिरोळ तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात ...
शिरोळ : येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल बबन मोहिते यांची भीम कायदा सामाजिक संघटनेच्या शिरोळ तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मोहिते यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची या पदी निवड करण्यात आली असून, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल पोवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी सूरज कांबळे, बाळासाहेब केंगारे, सागर कांबळे, सौरभ जावीद, वैभव गवळी, राजू कांबळे उपस्थित होते.
फोटो - ११०४२०२१-जेएवाय-०६-अमोल मोहिते
-
शहराप्रमाणेच घर अनुदान द्या
शिरोळ : शहराप्रमाणे घर बांधकामासाठी शासनाने अडीच लाख रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांतून होत आहे. घर बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यासह मजुरीचा दर ग्रामीण व शहरी भागात तेवढाच आहे. मात्र, शहरी भागात अडीच लाख, तर ग्रामीण भागात दीड लाख, असे अनुदान शासनाकडून लाभार्थ्यांना दिले जाते. यामध्ये बदल करावा, अशी मागणी लाभार्थ्यांतून होत आहे.