शिरोळ संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:31 AM2021-04-30T04:31:59+5:302021-04-30T04:31:59+5:30
शिरोळ : लसीअभावी बुधवारी शिरोळ तालुक्यात लसीकरण मोहीम ठप्प झाली होती. गुरुवारी ३४१० लसींचा साठा उपलब्ध झाल्याने नागरिकांना दिलासा ...
शिरोळ : लसीअभावी बुधवारी शिरोळ तालुक्यात लसीकरण मोहीम ठप्प झाली होती. गुरुवारी ३४१० लसींचा साठा उपलब्ध झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अब्दुललाट, दानोळी, घालवाड, जयसिंगपूर, नृसिंहवाडी, नांदणी, टाकळी, कुरुंदवाड, शिरोळ, दत्तवाड याठिकाणी लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध झाल्यामुळे केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी झाली होती.
----------------------
शिरोळमध्ये नवे १०३ रुग्ण
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव वाढतच चालला आहे. गुरुवारी आणखी १०३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकीकडे लसीचा तुटवडा असताना, कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना सेंटर वाढविण्याची मागणी होत आहे. खासगी लॅबवर कोरोना तपासणीसाठी गर्दी होत आहे. अब्दुललाटमध्ये एकाच कुटुंबातील बाराजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.