टोप खाणप्रश्नी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार सर्व पक्षीय बैठकीत निर्णय : जनआंदोलन उभारण्याचा पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:40 AM2018-05-20T00:40:25+5:302018-05-20T00:40:25+5:30
शिरोली : टोप खाणप्रश्नी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची भेट घेऊन याविषयी भूमिका मांडण्याचा निर्णय आज, शनिवारी टोप येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
शिरोली : टोप खाणप्रश्नी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची भेट घेऊन याविषयी भूमिका मांडण्याचा निर्णय आज, शनिवारी टोप येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
टोपसह पाच ग्रामपंचायती व स्मॅकने एकत्रित जनहित याचिका दाखल करून कोल्हापूर शहराच्या कचऱ्याविरोधात जन आंदोलन उभा करण्याचा निर्णय टोप ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित केलेल्या सर्व पक्षीय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजीव आवळे होते.
राजीव आवळे म्हणाले, टोप गावच्या हद्दीतील दगडखाणीमध्ये शहराचा कचरा कशासाठी? शहरातील आरक्षित जागा बिल्डरांच्या घशात गेल्या आणि आता शहराचा कचरा आमच्या दारात का? सध्या शहराचा कचरा कसबा बावड्यात टाकला जातो. तेथील लोकांचा या कचºयाला सतत विरोध आहे. या घनकचºयामुळे शहरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मग हा कचरा टोपमध्ये आल्यावर येथील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकणार नाही का? शिये फाटा येथील टोपच्या हद्दीतील दगडखाणीमध्ये कचरा आला तर शिरोली एमआयडीसीमध्ये येणाºया उद्योजक व कामगारांना, शिये गावाला, टोपमधील सध्या राहत असलेल्या लोकांना याचा मोठा त्रास होणार आहे. या बैठकीला शिये जिल्हा परिषदेचे सदस्य मनीषा कुरणे, बाजीराव पाटील, संभापूरचे सरपंच प्रकाश झिरंगे, कृती समितीचे अध्यक्ष विठ्ठलपंत पाटील, उद्योजक धनाजी पाटील, आदी उपस्थित होते.
राजू शेट्टी, मिणचेकर, नरके मुख्यमंत्र्यांना माहिती देणार
शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर व चंद्रदीप नरके हे दोन्ही आमदार मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदास कदम यांची भेट घेऊन त्यांना कचºयाबाबत माहिती देणार आहेत.
यावेळी टोपच्या सरपंच रूपाली तावडे म्हणाल्या, हा सामूहिक लढा आहे. टोपसह संभापूर, कासारवाडी, शिये, नागाव, शिरोली एमआयडीसी (स्मॅक) या सर्वांनी एकत्रितपणे येऊन हा लढा उभा करून कोल्हापूर शहराचा कचरा परतवून लावू. यासाठी सर्वांचा सहभाग असणे आवश्यक आहे, तरच हा लढा यशस्वी होईल .
स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील म्हणाले, टोप येथील दगडखाणीमध्ये कोल्हापूर शहराचा कचरा आल्यावर उद्योजकांना व कामगारांना मोठा त्रास होणार आहे. भटकी कुत्री, डुकरे, जनावरे यांचा उपद्रव वाढेल. रोगराई पसरून कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. याला आमचा विरोधच राहील. या आंदोलनात स्मॅकचा सहभाग असेल.