वाहतुकीच्या कोंडीत तोरस्कर चौक

By Admin | Published: March 23, 2015 11:53 PM2015-03-23T23:53:51+5:302015-03-24T00:15:03+5:30

उपक्रमाचे कौतुक : पाणी, रस्ते, गटर्ससंबंधी मांडल्या तक्रारी; मैदानासह एकेरी वाहतुकीची गरज

Toraskar Chowk in the traffic congestion | वाहतुकीच्या कोंडीत तोरस्कर चौक

वाहतुकीच्या कोंडीत तोरस्कर चौक

googlenewsNext

गणेश शिंदे, भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -कोल्हापूर : येथून रत्नागिरीकडे जाणारा मुख्य रस्ता तोरस्कर चौकातून जात असल्याने बारा महिने चोवीस तास वाहतुकीची समस्या गंभीर आहे. दिवसभर वाहतुकीची कोंडी होत असल्याने लहान-मोठे अपघात होत असतात. त्यामुळे या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी ‘लोकमत आपल्या दारी व्यासपीठा’वर मांडली. याशिवाय गटर्स, पाणी, शौचालय अशा मूलभूत समस्याही मांडल्या. तोरस्कर चौकात सोमवारी सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम झाला.
ब्रह्मपुरी, खोलखंडोबा असा परिसर येतो. ‘जुनं कोल्हापूर’ अशी ओळख आहे. अनेक वर्षांपासून या परिसराचा सर्वांगीण विकास खुंटला आहे, असा रहिवाशाचा सूर राहिला. तोरस्कर चौक व परिसरात वाहनांची गर्दी असते. दिवसभर पादचाऱ्यांना
ये-जा करणे मुश्कील होते.
आजूबाजूला चार शाळा आहेत. मुलांना शाळेत सोडायला जाताना जीव धोक्यात घालून रोज पालकांना जावे लागते. लहान-सहान अपघात होतात. रस्ता रुंदीकरणासाठी शिवाजी पुलाचे काम सुरू आहे. पुलाचे २५ टक्के काम रेंगाळले आहे. हे काम त्वरित करावे, यासाठी प्रसंगी आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी रहिवाशांनी दिला.
परिसरात सर्वत्र महिलांसाठी पुरेशा प्रमाणात शौचालय नाहीत. गटारांची रोज स्वच्छता केली जात नाही, तुंबून राहतात. शेतकरी कुटुंबे आपल्याकडील जनावरांचे शेण, वैरण गटारीत टाकतात. वारंवार सांगूनही ऐकत नाहीत. परिणामी आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्याकडे महानगरपालिकने गांभीर्याने लक्ष द्यावे, याकडे लक्ष वेधले.
परिसरातील मुले विविध खेळांत पारंगत आहेत; मात्र मैदान नसल्यामुळे रोज सराव करता येत नाही. चमकदार कामगिरी करण्यावर मर्यादा येत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने मैदानाची सुविधा द्यावी. तोरस्कर चौकातून नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवजड वाहनांसाठी प्रवेश बंदी आहे. मात्र, राजरोसपणे बंदी झुगारून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते त्याचाही त्रास रहिवाशांना होत आहे.

आधार कार्ड केंद्रे वाढवा
आधार कार्ड केंद्रांची संख्या शासनाने वाढविली पाहिजे. कारण, नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी पहाटेपासूनच रांगेत उभा राहावे लागते. यावर निर्णय घ्यावा.
- सुरेंद्र चौगले,
गटारीची दुरवस्था
गटारींची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे घुशींचे प्रमाण वाढले आहे. आधार कार्ड सक्तीमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. - जयसिंग जाधव,
शौचालयांची संख्या कमी
शौचालयांची संख्या कमी आहे. ती वाढवावी, तसेच पाणी वेळेवर येत नाही.
- नबिशा मकानदार, नागरिक ब्रह्मपुरी परिसर
सोयी-सुविधा द्या
ब्रह्मपुरी परिसरात खासगी जागेतील कुळांकडून महापालिकेने १९९५ ला घरफाळा घेतला. मात्र, सोयी-सुविधा पुरविल्या जात नाहीत. - अरुण खोडवे,
शौचालये वाढवा
ब्रह्मपुरी परिसरात महिलांसाठी स्वतंत्र शौचालये असावीत. सध्या उघड्यावर शौचालयाला बसावे लागते. त्यामुळे याठिकाणी लवकर शौचालये करावीत. तसेच पाण्याची समस्या गंभीर आहे. ती सोडवावी.
- सॅमसन दाभाडे,
गटारीत दुर्गंधी
गटारी लहान आहेत. गटारीत कायमस्वरूपी दुर्गंधी असते. त्यामुळे मोठे चॅनेल बांधावीत, जेणेकरून आरोग्याची समस्या उद्भवणार नाही.
- रावजी विठ्ठल पाटील,
परिसर अस्वच्छ
बोडके गल्ली हा परिसर तोरस्कर चौक व खोलखंडोबा प्रभागात विभागला आहे. त्यामुळे या परिसरात स्वच्छता होत नाही. तसेच सध्या येथे विद्युत खांबांवर दिवे नाहीत. स्थानिक नगरसेवक इकडे फिरकत नाहीत.
- रणजित आडसुळे,
वाहतूक धोकादायक
सोन्यामारुती चौक ते शिवाजी पूल हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या भागात शाळा, हायस्कूल व महाविद्यालय असल्याने वाहतुकीची कोंडी जाणवते. रोज छोटे-मोठे अपघात होतात. महापालिका प्रशासनाने याचे नियोजन करावे, अन्यथा जनआंदोलन उभे केले जाईल.
- इब्राहिम मुल्ला,
क्रीडांगण हवे
परिसरातील मुलांसाठी क्रीडांगण नाही. सध्या जुना बुधवार पेठेतील मुलांचा फुटबॉल संंघ भरारी घेत आहे. त्यामुळे महापालिकेने या परिसरातील मुलांसाठी हक्काचे मैदान द्यावे.
- सुशांत भांदिगरे, नागरिक
एकेरी मार्ग करा
अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. सतत गर्दीचा मार्ग झाला आहे. त्यामुळे जुना बुधवार पेठ-शिवाजी पूल हा मार्ग एकेरी करावा.
- बाळासाहेब आंबी,
पाणी वेळेवर नाही
गटारींची अस्वच्छता आहे. त्याचबरोबर पाणी वेळेवर येत नाही. अपुरा पाणीपुरवठा होतो.
- शिल्पा हांडे, जुना बुधवार पेठ
पाण्याची चणचण
पाण्याची चणचण भासते. पाण्याची समस्या सोडविणे आवश्यक आहे.
- अंजली रघुनाथ जाधव, डांगे गल्ली
वाहतुकीची कोंडी
वाहतुकीची कोंडी होते. बालचमूसह वृद्धांना रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. त्यामुळे हा मार्ग एकेरी करावा.
- राजश्री हांडे,
समस्यांकडे दुर्लक्ष
खोलखंडोबा परिसरात पाणीपुरवठा होत नाही. गटारांची दुरवस्था झालेली आहे. स्थानिक नगरसेवक समस्यांकडे दुर्लक्ष करतात.
- आर. एन. जाधव, कसबेकर
पार्किंगचा प्रश्न गंभीर
शाळांच्या खासगी बसेसवर मुलांच्या संरक्षणासाठी महिला असाव्यात. त्याचबरोबर शहरातील पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
- अ‍ॅड. एस. डी. सोळांकुरे, नागरिक
अपुरा पाणीपुरवठा
पाणी वेळेत येत नाही. सकाळच्या सत्रात तर केवळ १५ मिनिटे पाणी येते. त्यात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.
- पांडुरंग य. पाटील, शुक्रवार पेठ
गतिरोधक बसवा
शुक्रवार पेठ ते शिवाजी पूल या नवीन रस्त्यावर पाच ते सहा स्पीडब्रेकर (गतिरोधक) बसवावेत, जेणेकरून अपघात होणार नाहीत.
- रमाकांत वायंगणकर,
डासांचे साम्राज्य
तोरस्कर चौककडून पंचगंगा नदीकडे येणाऱ्या रस्त्यावरील पेरूच्या बागेजवळ डासांचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने याप्रश्नी महापालिकेला निवेदन दिले आहे. त्याचबरोबर पिकनिक पॉर्इंट (ब्रह्मपुरी) सेंटर येथील विद्युत खांबावरील वाहिन्या धोकादायक स्थितीत आहेत.
- वसंत आडगुळे,

आणि महिला बोलू लागल्या..
‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. समस्या, तक्रारी, गाऱ्हाणी ऐकण्यासाठी ‘लोकमत’ची टीम चौकात थांबल्यानंतर कुतूहलाने माहिती घेतली. उत्स्फूर्तपणे तक्रारी मांडल्या. ‘लोकमत’ची टीम नदीघाटावर समस्यांचा वेध घेण्यासाठी गेली. तेथील महिलांनी मोठ्या आत्मविश्वासाने समस्या मांडल्या.

तोरस्कर चौकात एका ६० वर्षीय वृद्ध महिलेने पोटतिडकीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत विमल बसाप्पा आंबी म्हणाल्या, तोरस्कर चौक हा रस्ता दिवस-रात्र वर्दळीचा बनला आहे. या परिसरात शाळा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची ये-जा असते. हा रस्ता एकेरी करावा, असे सांगून महापालिकेच्या प्राथमिकशाळा बंद पडत असल्याची खंत व्यक्त केली.

Web Title: Toraskar Chowk in the traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.