जुना पूल बनणार पर्यटन केंद्र --सुशोभित करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:53 AM2019-05-30T00:53:40+5:302019-05-30T00:55:25+5:30
पर्यायी शिवाजी पूल उभारल्यामुळे शतक पार केलेल्या जुन्या पुलावरून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा पूल सुशोभित करून खुला करण्यात येणार आहे.
कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पूल उभारल्यामुळे शतक पार केलेल्या जुन्या पुलावरून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा पूल सुशोभित करून खुला करण्यात येणार आहे.
कोकणला जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणून कोल्हापूर-रत्नागिरी या महामार्गाची गणना होते. या मार्गावर कोल्हापूर शहरानजिक असणारा ब्रिटिशकालीन शिवाजी पूल हा गेली १२५ वर्षे अनेक घटनांचा साक्षीदार बनून आजही खंबीरपणे उभा आहे; पण या पुलाचे आयुर्मान संपल्यामुळे आता त्याच्या शेजारीच पर्यायी पूल उभारला आहे. महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर गेल्या वर्षी पुरावेळी सुरक्षेच्या दृष्टीने शिवाजी पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली होती; पण यंदाच्या पावसाळ्यापूर्वी पर्यायी शिवाजी पुलावरून वाहतूक सुरू होणार आहे; त्यामुळे महापुरावेळी प्रवाशांची गैरसोय टळेल.
जुन्या पुलाची रुंदी सुमारे ५.५ मीटर असल्याने त्यावर सद्यस्थितीत दोन्हीही बाजूने ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. पर्यायी पुलाची रुंदी १३ मीटर असल्याने, पादचाºयासाठी स्वतंत्र पाथवे असल्यामुळे या पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय राष्टÑीय महामार्ग विभागाने घेतला आहे.
नवीन पुलावरून जूनच्या दुसºया आठवड्यात वाहतूक सुरू होणार आहे, त्यानंतर जुन्या पुलाच्या प्रारंभी दोन्ही बाजूस किमान फूटभर उंच कठडा बांधून त्यावरून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच हा पूल हेरिटेज म्हणून पर्यटकांचे खास आकर्षण बनावे, यासाठी तो सुशोभित करण्यात येणार आहे. जुन्या पुलावर विद्युत रोषणाई, तसेच ज्येष्ठांसाठी खास बैठक व्यवस्था व सुरक्षा कठड्यावर रेलिंग करण्यात येणार आहे.
संभाजीराजेंकडून पुलाची पाहणी
बुधवारी दुपारी खासदार संभाजीराजे यांनी पर्यायी शिवाजी पुलास भेट देऊन, पुलाच्या उर्वरित कामाबाबत ठेकेदार एन. डी. लाड यांच्याकडून माहिती घेतली. तसेच जुन्या पुलाबाबतही राष्टÑीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोसले यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्तडॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आदी उपस्थित होते.
कोल्हापूर येथील पर्यायी शिवाजी पुलाच्या कामकाजाची खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी दुपारी पाहणी केली. यावेळी दौलत देसाई, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अशोक भोसले आदी उपस्थित होते.