लोकसहभागातून जिल्ह्याचा पर्यटन विकास करणार : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:26 AM2021-09-27T04:26:27+5:302021-09-27T04:26:27+5:30
आमदार प्रकाश आबिटकर, संजयदादा बेनाडीकर, ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस प्रमुख उपस्थित होते. २७ सप्टेंबरला जिल्हा प्रशासन व विविध ...
आमदार प्रकाश आबिटकर, संजयदादा बेनाडीकर, ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस प्रमुख उपस्थित होते. २७ सप्टेंबरला जिल्हा प्रशासन व विविध संस्था यांच्यामार्फत पर्यावरण सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे रेखावार यांनी सांगितले. आमदार प्रकाश आबिटकर यांनी पाटगाव परिसराचे व येथील निसर्गरम्य वातावरणाचे नेहमीच अनेकांना आकर्षण राहिले आहे. ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटगाव परिसरातील पर्यटनाचा विकास झाल्यास अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने होत असणाऱ्या आर्ट कॅम्पमध्ये जिल्ह्यातील अनेक नामवंत कलावंत सहभागी झाले आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या मदतीने पाटगाव येथे जर आर्ट गॅलरी निर्माण झाली, तर पाटगाव परिसराचा इतिहास सर्वदूर पोहोचेल असे सांगितले. सत्यजित जाधव, तहसीलदार आश्विनी वरुटे, गट विकास अधिकारी सरीता पोवार, पं. स. सदस्या सरिता वरंडेकर, विश्वजित जाधव, संदीप वरंडेकर, वाय. के. पाटील, डी. के. मोरसे, सरिता वर्दम, विजय टिपुगडे उपस्थित होते.
फोटो - कोल्हापूर जिल्हा पर्यटन सप्ताह प्रारंभप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार. सोबत आमदार प्रकाश आबिटकर, संजय बेनाडीकर, ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, अश्विनी वरुटे, सरिता पोवार, आदी उपस्थित होते.