बर्की धबधब्यावर पर्यटकांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:18 AM2021-06-21T04:18:02+5:302021-06-21T04:18:02+5:30
बर्की येथील तापेरा धबधबा अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. राज्यातील सर्व भागातून दरवर्षी पर्यटक येथे पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटतात. तापेरा ...
बर्की येथील तापेरा धबधबा अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. राज्यातील सर्व भागातून दरवर्षी पर्यटक येथे पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटतात. तापेरा या धबधब्याशिवाय येथे अनेक लहान मोठे धबधबे कोसळत असल्याच पहायला मिळते. हिरवेगार डोंगर त्यात वाहणारे धबधबे,डोंगरांना कवेत घेणारे धुके अन कोसळणारा पाऊस यामुळे इथे आल्यानंतर सर्वच पर्यटक इथल्या निसर्गाच्या प्रेमात भान हरपून जातात. अलीकडेच सुरू केलेल्या तलावातील बोटिंगचा आनंदही लुटतात.
पर्यटकांच्या पसंतीला उतरलेले हे पावसाळी पर्यटनस्थळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी बंद करण्यात आले आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीमुळे कोरोनाच्या प्रसार होऊ शकतो. त्यामुळे या पर्यटन केंद्राकडे कुणीही येऊ नये, असे निवेदन ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष आनंद पाटील ,उपाध्यक्ष,गंगाराम बमू घुरके,सचिव, विकास कांबळे, यांनी शाहूवाडी प्रशासनाला दिले आहे.